घरक्रीडाIPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची एक ओव्हर मुंबईला पडली महागात, एका षटकात...

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची एक ओव्हर मुंबईला पडली महागात, एका षटकात चोपल्या ३१ धावा

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबने दिलेल्या या आव्हाचा पाठलाग करण्यासाठी मुंबई मैदानात उतरली आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबने दिलेल्या या आव्हाचा पाठलाग करण्यासाठी मुंबई मैदानात उतरली आहे. दरम्यान, या समान्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला गोलंदाजीवेळी चांगली कामगिरी करता आली नाही. एकचा षटकात तब्बल ३१ चोपल्या. त्यामुळे मुंबईचे चाहते नाराजे झाले आहेत. (MI vs PBKS Arjun Tendulkar Punjab Kings scored 109 runs in last 6 overs)

अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) एका षटकाने पंजाब किंग्सला जास्तीत जास्त धावा करण्याची संधी मिळाली. सामन्याच्या १५व्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेताना पंजाबला ४ बाद ११८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते. परंतु अर्जुनच्या एका षटकात ३१ धावा चोपल्या आणि मुंबईच्या हातून सामना निसटत गेला. सॅम करन व हरप्रीत भाटीया या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच सामचार घेतला. पंजाबने शेवटच्या ५ षटकांत तब्बल ३ बाद ९६ धावा केल्या.

- Advertisement -

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीनने तिसऱ्या षटकात पंजाबला धक्का देताना मॅथ्यू शॉर्टला (११) बाद केले. प्रभसिमरन सिंग (२५) व अथर्व तायडे यांनी २४ चेंडूंत ४७ धावा जोडल्या आणि सातव्या षटकात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) भन्नाट यॉर्कर टाकून ही भागीदारी तोडली.

लाएम लिव्हिंगस्टोनला (१०) पीयुष चावलाने बाद केले. लिव्हिंगस्टोन पुढे येऊन फटका मारणार हे पीयुषने आधीच हेरले आणि चेंडू डाव्या बाजूला टाकला. यष्टिरक्षक इशान किशनने तितक्याच चतुराईने वाईड चेंडू टिपला आणि स्टम्पिंग केले. त्याच षटकात सेट फलंदाज अथर्व तायडे (२९) त्रिफळाचीत झाला. यावेळी १५ षटकांत पंजाबच्या ४ बाद ११८ धावा झाल्या होत्या. त्यानंतर रोहितने १६वे षटक अर्जुनला देण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

सॅम करन व हरप्रीतने ३१ धावा चोपल्या. त्यानंतर १७व्या षटकात १३ आणि १८व्या षटकात २५ धावा जोडल्या. हरप्रीत २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांवर बाद झाला. जितेश शर्माने आल्या आल्या सलग दोन षटकार खेचले. १९व्या षटकात सॅम करन बाद झाला. त्याने २९ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावा चोपल्या. जितेश ७ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. त्याने चार खणखणीत षटकार खेचले. पंजाबने ८ बाद २१४ धावा उभ्या केल्या.


हेही वाचा – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अदर पूनावलांचे मोठे विधान; म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -