घरक्रीडाMI VS RCB : विजेत्या संघाचा 'Play Off' मध्ये पोहोचण्याचा मार्ग होईल...

MI VS RCB : विजेत्या संघाचा ‘Play Off’ मध्ये पोहोचण्याचा मार्ग होईल सोपा

Subscribe

नवी दिल्ली : IPL 2023 च्या 16 व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांसाठी आजचा सामना करो वा मरो असणार आहे, कारण जो संघ सामना जिंकेल त्याला Play Off च्या शर्यतीचा मार्ग सोपा होणार आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 16 व्या हंगामातील 54 वा सामना पार पडणार आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांनंतर 5 विजय आणि 5 पराभवासह 10 गुणांसह गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीसुद्धा 10 सामन्यांनंतर 5 विजय आणि 5 पराभवासह 10 गुणांसह चांगल्या रनरेटमुळे सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबईने किंवा आरसीबीने सामना जिंकला तर दोघांनाही राजस्थान रॉयल्सला मागे टाकून चौथ्या स्थानावर जाण्याची संधी आहे. यानंतर मुंबईने आणि आरसीबीने उर्वरित सर्व सामने जिंकले तर ते थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.

- Advertisement -

मुंबईला आज आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल, तर त्यांना गुजरात टायंटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध उर्वरीत तिन्ही सामने जिंकताना रनरेटही चांगला ठेवावा लागेल. पण जर एकही सामना गमावल्यास त्यांना इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. जर मुंबईचा दोन किंवा अधिक सामन्यात पराभव झाला तर त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल.

आरसीबीला आजच्या सामन्यात मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांना राजस्थान, हैदराबाद आणि गुजरातविरुद्धचे सर्व सामने जिंकावे लागतील आणि आपला रनरेटही इतर संघापेक्षा चांगला ठेवावा लागेल. जर आरसीबीने उर्वरती 3 सामन्यांपैकी एकही सामना गमावला तर त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. त्याचवेळी दोन किंवा अधिक सामने गमावल्यास आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल.

- Advertisement -

गुजरात अव्वल स्थानावर तर चेन्नई सुरक्षित स्थानावर
गुजरात टायटन्स सध्या 11 सामन्यांनंतर 8 विजय मिळवून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित 3 पैकी फक्त एकच सामना जिंकण्याची आवश्यकता आहे. मात्र गुजराने उर्वरीत तिन्ही सामने मोठ्या फरकाने हरल्यास त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागू शकते. याशिवाय चेन्नई सुपर किंग्स 11 सामन्यांनंतर 6 विजय आणि एक अनिर्णित सामन्यामुळे 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये कायम राहण्यासाठी चेन्नईला उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकणे आवश्यक आहे. जर चेन्नईने 3 पैकी 1 सामना जिंकला तर त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागले. पण त्याचवेळी तिन्ही सामने गमावल्यास चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -