घरक्रीडाMI vs RR : सलग तिसऱ्या सामन्यात मुंबईचा पराभव; राजस्थानचा 6 विकेट...

MI vs RR : सलग तिसऱ्या सामन्यात मुंबईचा पराभव; राजस्थानचा 6 विकेट राखून विजय

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वातील चौदावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. या पर्वात पहिल्यांचा मुंबईने घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेड मेदानात हा सामना खेळला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 विकेट्स राखून मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे.

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वातील चौदावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. या पर्वात पहिल्यांचा मुंबईने घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेड मेदानात हा सामना खेळला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 विकेट्स राखून मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे. तसेच, या पराभवासह मुंबईचा सलग तिसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 126 धावांचे आव्हान राजस्थान समोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 15.3 षटकात हा सामना जिंकला. (MI vs RR Mumbai lost in third consecutive match Rajasthan won by 6 wickets)

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थनने नाणेफेकीचा कौल जिकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाला चांगली खेळी करता आली नाही. मुंबईचा सलामीवर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा स्वत:त बाद झाला. अवघ्या शून्य धावांवर तो माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या नमन धीर हा देखील शून्यावर बाद झाला. पहिले दोन खेळाडू शून्यावर बाद झाल्याने मुंबईसमोर धावांचे संकट उभे राहिले होते. त्यावेळी दोन फलंदाज बाद झाल्यानंतर उत्तम फलंदाजी व्हावी या विश्वासाने मुंबईच्या संघाने डेवाल्ड ब्रेवीस याला फलंदाजीसाठी पाठवले. मात्र ब्रेवीस शून्य धावा करत तंबूत परतला. कर्णधआर हार्दिक पांड्यालाही चांगली खेळी करता आली नाही.

- Advertisement -

परिणामी, मुंबईच्या कोणत्याच खेळाडूला अधिक धावसंख्या करता आली नाही. अखेर 20 षटकात 9 विकेट गमावून मुंबईने 126 धावांचे आव्हान राजस्थानसमोर ठेवले. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट याने उत्तम गोलंदाजी केली. माजी कर्णधार रोहित शर्माला बाद केले. त्यानंतर नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेवीस यांनाही बाद करत आजच्या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय, फिरकीपटू युझवेंद्र चहल यानेही तीन विकेट्स घेतल्या.


हेही वाचा – Rohit Sharma : मुंबईचा राजा रोहित शर्मा…, वानखेडेबाहेर चाहत्यांकडून घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -