घरक्रीडाआर्चरचे कृत्य मूर्खपणाचे - अ‍ॅथर्टन

आर्चरचे कृत्य मूर्खपणाचे – अ‍ॅथर्टन

Subscribe

जोफ्रा आर्चरला आता पाच दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमांचा भंग केल्याने त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघातून वगळण्यात आले. खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरण सोडून जाण्याची परवानगी नसतानाही साऊथहॅम्पटन येथे झालेली पहिली कसोटी संपल्यावर आर्चर ब्रायटन येथे त्याच्या घरी जाऊन आला. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. आता आर्चरला पाच दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर त्याची दोनदा कोरोना चाचणी होईल आणि दोन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच तो इंग्लंड संघात परतू शकणार आहे.

इंग्लंड संघाचे आणि त्याचेही नुकसान

आर्चरचे कृत्य मूर्खपणाचे होते, अशा शब्दांत इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल अ‍ॅथर्टन यांनी त्याच्यावर टीका केली. आर्चर बेजबाबदारपणे वागल्याने इंग्लंड संघाचे आणि त्याचेही नुकसान झाले आहे. एक म्हणजे त्याने संघातील स्थान गमावले, दोन म्हणजे हा कसोटी सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा होता, पण आर्चरमुळे आता त्यांना पुन्हा नव्याने योजना आखाव्या लागणार आहेत. तिसरे म्हणजे ईसीबीने पुन्हा क्रिकेट सुरु व्हावे यासाठी केलेल्या मेहनतीला त्याने धोका पोहोचवला आहे. ईसीबीला सहा कसोटी सामन्यांचे (तीन विंडीजविरुद्ध, तीन पाकिस्तानविरुद्ध) आयोजन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे, असे अ‍ॅथर्टन म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -