West Indies vs England: वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधारला पद सोडण्याचा सल्ला

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात ०-४ असा सामना इंग्लंडने गमावला आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडने ०-१ असा सामना गमावल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार जो रूटला माजी दिग्गज क्रिकेटपटू मायकल वॉनने रूटला कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला आहे. जर रूटने मला सल्ला मागण्यासाठी फोन केला तर त्याला मी सरळ भाषेत कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास सांगेन, असं मायकल वॉन म्हणाला.

क्रिकेटमध्ये आणि मालिकेमध्ये त्याला जी गोष्ट करायची होती. त्याने तेवढीच केली आहे. जर जो रूटने मला पुढील आठवड्यात फोन करून माझा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला. तर मी त्याला प्रमाणिकपणे सांगेन की, तुम्ही कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकता, असं मायकल वॉन म्हणाला.

जो रूटने आतापर्यंत ६४ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. तर २७ सामन्यांमध्ये त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. इंग्लंडच्या कोणत्याही कर्णधाराने अशा प्रकारचा विजय संघाला मिळवून दिलेला नाहीये. दरम्यान, रूटला २६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु एक कर्णधार म्हणून त्याने सर्वाधिक विजय मिळवले आहेत.

रूटने स्वत:हून कर्णधार पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी इच्छा वानने व्यक्ती केली आहे. रूटने स्वतःहून पायउतार व्हावे, अन्यथा मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालकांनी त्याला या पदावरून कायमचे काढून टाकावे, असं माजी कर्णधार म्हणाले.

वेस्ट इंडिजने इंग्लंडला १० विकेट्सने हरवत तीन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली आहे. पहिली आणि दुसरी कसोटी मालिका ड्रॉ झाली होती. मागील १८ वर्षांपासून वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी इंग्लंड वाट पाहत आहे. मात्र आता इंग्लंडना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आता रिचर्ड्स-बॉथम ट्रॉफी ही वेस्ट इंडिजकडे राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : Google Play Store वरून Hangouts होणार गायब, फक्त ‘या’ युजर्सना अॅप वापरता येणार