घरक्रीडाMichael Vaughan : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन मुंबईत खेळतोय गल्ली क्रिकेट;...

Michael Vaughan : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन मुंबईत खेळतोय गल्ली क्रिकेट; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

दरवर्षी इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) काळात अनेक परदेशी खेळाडू गल्ली क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. गतवर्षी एबी डिव्हिलीएर्सचा असाच एक गल्ली क्रिकेट खेळणार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच, क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचाही मुंबई मेट्रोच्या कामाच्या शेजारी खेळत असलेल्या मुलांसोबत खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मुंबई : दरवर्षी इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) काळात अनेक परदेशी खेळाडू गल्ली क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. गतवर्षी एबी डिव्हिलीएर्सचा असाच एक गल्ली क्रिकेट खेळणार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच, क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचाही मुंबई मेट्रोच्या कामाच्या शेजारी खेळत असलेल्या मुलांसोबत खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा यंदाच्या आयपीएलच्या काळात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Michael Vaughan Former England captain enjoyed gully cricket with kids in Mumbai during IPL 2024)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन हा देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहे. मायकल वॉन लहान मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळत असून एक चिमुकला त्याला गोलंदाजी करत आहे. सर्वसामान्यांचा क्रिकेट म्हणजेच अनवाणी बॉलर, पुठ्ठ्याचा स्टम्प आणि आजुबाजूला वाळू यामध्ये दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2024: KKR देणार दिल्लीला घरच्या मैदानावर आव्हान, जाणून घ्या कोण कोणावर करणार मात

हा व्हिडीओ शेअर करताना मायकल वॉन याने एक भन्नाट कॅप्शन दिले. “मुंबईत लहानग्यांसोबत क्रिकेट खेळून आनंद वाटला. कसोटी सामन्यांमधील आणि येथील खेळपट्टी समान आहे”, असे मायकेल वॉनने कॅप्शन दिले आहे.

- Advertisement -

सध्या आयपीएलच्या 17व्या पर्वाचा थरार रंगला आहे. देश विदेशातील माजी खेळाडू देखील विविध माध्यमांतून या स्पर्धेशी जोडले गेले आहेत. अनेकांवर खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्याची जबाबदारी आहे, तर काही जण समालोचनाच्या माध्यमातून आयपीएलचा एक भाग आहेत. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन सातत्याने आयपीएलबद्दल व्यक्त होत असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेट विश्वातील चालू घडामोडींवर भाष्य करत असतो.


हेही वाचा – RCB Vs LSG: लखनऊने मारलं मैदान; मयंक यादवच्या वेगवान माऱ्यापुढे RCBने टेकले गुडघे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -