घरक्रीडाMilkha Singh यांचा संघर्षमय प्रवास,एकेकाळी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर केले होते बूट पॉलिश

Milkha Singh यांचा संघर्षमय प्रवास,एकेकाळी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर केले होते बूट पॉलिश

Subscribe

भारत पाकिस्तान फाळणीच्या काळात त्यांच्या आई वडिलांची हत्या करण्यात आली.

भारतीय क्रीडा क्षेत्रात आपली अभूतपूर्व छाप उमटवणारे माजी धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे शुक्रवारी निधन झाले. (Milkha Singh passed away) आयुष्यातील स्वप्ने आणि ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी संघर्ष करत भारताच्या इतिसाच्या सोनेरी पानांवर आपले नाव कोरले. आयुष्यातला अनेक संकटांना तोंड देत ते देशभरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. १९६०मध्ये रोम ऑलंपिक स्पर्धेत त्यांनी केलेली कामगिरी कोणीही विसरु शकत नाही.रनिंग ट्रॅक त्यांच्यासाठी एका खुल्या पुस्तकाप्रमाणे होते. स्वतंत्र भारतातील सर्वात मोठे खेळाडू म्हणून मिल्खा सिंग यांच्याकडे पाहिले गेले. आयुष्यात अनेक संकटांना तोड देत, अनेक जखमा खात त्यांनी आपल्या खेळाचा प्रवास अवितर सुरु ठेवला. वेळाला मिल्खा यांनी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या बाहेर बूट पॉलिश करण्याचे काम देखील केले. मात्र कधीही न हारता आलेल्या संकटाला धीराने तोंड देत क्रीडा क्षेत्रात आपली चांगली कामगिरी करत राहिले. ( Milkha Singh arduous journey, Shoes were once polished outside the Delhi railway station)

भारत पाकिस्तान फाळणीच्या काळात त्यांच्या आई वडिलांची हत्या करण्यात आली. त्यानंतर ते दिल्लीत काही छोटी मोठी काम करत ते त्यांचा पोट भरत होते. मिल्खा यांच्यासाठी रनिंग ट्रॅक हा एका मंदिरासरखा होता. धावपट्टीवरुन धावताना देवाचे आशिर्वाद आणि प्रेम सोबत होते. त्यांचे जिवन भयानक होण्याच्या दिशेने असताना त्यांना खेळाने वेळोवेळी सावरले. आई वडिलांची हत्या झाल्यानंतर अवघ्या १५ वर्षांच्या वयात त्यांना स्वत:चा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागाला. आई वडिलांना गमावल्यानंतर मिल्खा सिंग यांनी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या बाहेर बूट पॉलिश करण्यापासून प्रवाशांचे सामान उचलण्या पर्यंतचे काम करुन आपली उपजीविका चालवत होते. त्याचवेळी त्यांनी रेल्वेच्या प्रवशांचे सामान चोरल्याने त्यांना जेलमध्येसुद्धा जावे लागले. यादरम्यान त्यांच्या बहिणीने तिचे दागिने विकून मिल्खा सिंग यांना जेलमधून बाहेर काढले होते.

- Advertisement -

मिल्का सिंग यांना १९६०मध्ये पाकिस्तान इंटरनॅशल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती. मात्र ज्या भारत पाकिस्तान फाळणीत मिल्खा सिंग यांना आपले आई वडिल गमवावे लागले त्या देशात स्पर्धेसाठी जाण्यास नकार दिला होता. मात्र त्यावेळीचे तात्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी मिल्खा सिंग यांची समजूत घालून त्यांना इंटरनॅशल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेण्यासाठी राजी केले आणि या स्पर्धेत मिल्खा यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिक या पाकिस्तानच्या प्रसिद्ध खेळाडूवर मात करुन विजय मिळवला आणि पाकिस्तानच्या राष्ट्रपतीं त्यांना फ्लाइंड सिख हे नाव दिले आणि त्यानंतर मिल्खा सिंग हे फ्लाइंग सिख या नावाने जगभरात ओळखले जाऊ लागले.


हेही वाचा – Milkha Singh Death: …आणि मिल्खा सिंग Flying Sikh म्हणून ओळखले जाऊ लागले

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -