घरक्रीडाMilkha Singh Death: ...आणि मिल्खा सिंग Flying Sikh म्हणून ओळखले जाऊ लागले

Milkha Singh Death: …आणि मिल्खा सिंग Flying Sikh म्हणून ओळखले जाऊ लागले

Subscribe

पाकिस्तानचे त्यावेळचे तात्कालीन राष्ट्रपती फील्ड मार्शल आयूब खान यांनी मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सिख' असे नाव दिले

भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी चंदीगड येथील रुग्णालयात निधन झाले. (Milkha Singh passed away) एक महिन्यापूर्वी मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी आणि भारतीय वॉलीबॉल टीमची पूर्व कप्तान असलेल्या निर्मल कौर यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मिल्खा सिंग यांच्या जाण्याने सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिल्खा सिंग हे क्रीडा क्षेत्रातील सर्वांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. फ्लाइंग सिख (Flying Sikh) ही मिल्का सिंग यांना मिळालेली प्रसिद्ध ओळख होती. त्यांना ही ओळख मिळण्यामागची त्यांची कहाणी देखील तितकीच जबरदस्त आहे. ( Milkha Singh Death: … and Milkha Singh came to be known as the Flying Sikh)

२०१६मध्ये मिल्खा सिंग यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला होता. १९६०मध्ये मिल्का सिंग यांना पाकिस्तानमध्ये झालेल्या इंटरनॅशल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती. मात्र देशात झालेल्या फाळणीमुळे ते खुश नव्हते त्यामुळे पाकिस्तानात जाण्यास त्यांचा नकार होता. त्यावेळेचे तात्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी मिल्खा सिंग यांची समजूत काढल्यानंतर मिल्खा सिंग पाकिस्तान जाण्यास तयार झाले. त्यावेळी पाकिस्तानमध्ये अब्दुल खालिफ यांचे खूप नाव आहे त्यावेळचे ते सर्वात तेज धावपटू होते. स्पर्धेच्या दरम्यान पाकिस्तानातील जवळपास ६ हजार फॅन्स अब्दुल खालिक यांना प्रोत्साहन देत होते. तर दुसरीकडे मिल्खा सिंग यांनी अब्दुल खालिक यांना मागे टाकत स्पर्धा जिंकली होती. पाकिस्तानात मिल्खा सिंग यांच्या विजयानंतर पाकिस्तानचे त्यावेळचे तात्कालीन राष्ट्रपती फील्ड मार्शल आयूब खान यांनी मिल्खा सिंग यांना ‘फ्लाइंग सिख’ असे नाव दिले. त्यानंतर मिल्खा सिंग फ्लाइंग सिख या नावावे ओळखले जाऊ लागले.

- Advertisement -

मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियायी स्पर्धेत सुवर्ण पदके मिळवली. १९५८च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिल्खा सिंग सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. तर १९६०च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत मिल्खा सिंग यांचे प्रदर्शन सर्वश्रेष्ठ ठरले. मिल्खा सिंग यांनी १९५६ आणि १९६४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५९ मध्ये मिल्खा सिंग यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आले.


हेही वाचा – Milkha Singh Death : ‘तुम्ही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहाल’; सचिन, गांगुलीने वाहिली मिल्खा सिंग यांना आदरांजली

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -