Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Milkha Singh Death: मी माझा सर्वात चांगला मित्र, मार्गदर्शक गमावला; जीव मिल्खा...

Milkha Singh Death: मी माझा सर्वात चांगला मित्र, मार्गदर्शक गमावला; जीव मिल्खा सिंग यांची वडिलांबाबत भावनिक पोस्ट

मिल्खा यांचा मुलगा आणि गोल्फपटू जीव मिल्खा सिंगने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने भावनिक पोस्ट लिहिली.

Related Story

- Advertisement -

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले. मिल्खा यांना १९ मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना ३ जूनला चंदीगड येथील पीजीआयएमई रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आयसीयूमधून बाहेर हलवण्यात आले होते. तसेच त्यांचा कोरोनाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला होता. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मिल्खा यांचा मुलगा आणि भारताचा आघाडीचा गोल्फपटू जीव मिल्खा सिंगने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने आपल्या वडिलांबाबत भावनिक पोस्ट लिहिली.

आज फादर्स डे आहे. मी काय गमावले, याची दुर्दैवाने मला पुन्हा आठवण झाली. माझे वडील हे माझ्यासाठी केवळ वडील नाही, तर माझे सर्वात चांगले मित्र, माझे मार्गदर्शक, माझे गुरु होते. त्यांच्याप्रमाणेच सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक धैर्य आणि ताकद माझ्यात असेल अशी आशा करतो. मला या गोष्टींची आता आणि आयुष्यभर गरज भासणार आहे, असे जीव मिल्खा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

- Advertisement -

तसेच त्यांनी पुढे लिहिले, मी माझी आई आणि माझे वडील या दोघांनाही गमावले. मात्र, त्यापेक्षाही लोकांच्या हजारो मेसेजेसमुळे मी अधिक भावनिक झालो आहे. त्यांनी त्यांचा जवळचा व्यक्ती गमावला असे त्यांना वाटत आहे. या कठीण काळात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या वडिलांच्या सर्व चाहत्यांचे आणि शुभचिंतकांचे आभार मानतो.

 

- Advertisement -