घरक्रीडा२०२३मध्ये दक्षिण आफ्रिकेत 'या' संघांमध्ये रंगणार मिनी आयपीएलचा थरार

२०२३मध्ये दक्षिण आफ्रिकेत ‘या’ संघांमध्ये रंगणार मिनी आयपीएलचा थरार

Subscribe

जगभरात प्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रिमियर लीग आयपीएलच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. आयपीएल खेळण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारताची ही जगप्रसिद्ध आयपीएल दरवर्षी मार्च ते मे महिना या कालावधीत खेळवली जाते. परंतु, आता क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

जगभरात प्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रिमियर लीग आयपीएलच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. आयपीएल खेळण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारताची ही जगप्रसिद्ध आयपीएल दरवर्षी मार्च ते मे महिना या कालावधीत खेळवली जाते. परंतु, आता क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुढील वर्षी दोनदा आयपीएलचा थरार खेळाडूंसह क्रिकेटप्रेमींनाही अनुभवता येणार आहे. २०२३ मध्ये आयपीएलपूर्वी दक्षिण आफ्रिकेत मिनी आयपीएल खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं आयोजन पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे. (mini ipl tournament in south Africa six teams will played)

दक्षिण आफ्रिकेच होणाऱ्या मिनी आयपीएलसाठी एकूण ६ संघ खेळणार असल्याचे समजते. तसेच, या सहा संघाना आयपीएल फ्रॅन्चायजींच्या मालकांनीच विकत घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

या सहा संघाचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super King), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हे संघ दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळणार आहेत. परंतु, आयोजकांनी अजूनपर्यंत संघ विकत घेणाऱ्यांची अधिकृत घोषणा केलेली नाही.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सकडून अंबानी कुंटुंबीय, चेन्नईकडून एन.श्रीनिवासन, दिल्ली कॅपिटल्सचे पार्थ जिंदल, सनरायजर्सचे मारन कुटुंबीय, लखनौ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, राजस्थान रॉयल्सचं मनोज बदाडे या सहा फ्रंचायजींनी संघ विकत घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये मुंबई इंडियन्स (केप टाऊन), चेन्नई सुपर किंग्ज जोहान्सबर्ग), दिल्ली कॅपिटल्स (सेंच्युरियन), लखनौ सुपर जायंट्स (डरबन), सनरायजर्स हैदराबाद (पोर्ट एलिझाबेथ) आणि राजस्थान रॉयल्सला (पार्ल) अशी शहर मिळाली आहेत.

दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिग्जनं संघ विकत घेण्यासाठी २५० कोटींची बोली लावली. आयपीएल मॉडेलनुसार प्रत्येक टीमला १० वर्षांसाठी फ्रॅन्चायजी फीच्या १० टक्के द्यावे लागणार आहेत. आयपीएलप्रमाणे दक्षिण आफ्रिका टी-२० लीगही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल, अशी अपेक्षा केली जातं आहे.


हेही वाचा – भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा निश्चित; कर्णधारपदी लोकश राहुल?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -