घरक्रीडादोन वर्षानंतर आज घरच जेवण जेवतेय, चानूचा आनंदच पदकासाठीचा त्याग सांगून गेला

दोन वर्षानंतर आज घरच जेवण जेवतेय, चानूचा आनंदच पदकासाठीचा त्याग सांगून गेला

Subscribe

टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टींगमध्ये भारताच्या मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावत जगभरात भारताचे नाव उंचावर नेऊन ठेवले. यानंतर मीराबाईवर भारतासह जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतात दाखल होताच तिचे जंगी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राजकारण्यांनी सोशल मीडियावर मीराबाईचे अभिनंदन केले. देशाचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही तिचा जंग्गी स्वागत केले. इतकेच नाही तर मनिपूर सरकारकडून मीराबाईला १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करत तिची अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर नियुक्त करण्यात आली. या साऱ्या वैभवानंतर मीराबाईच्या संघर्षाचे दर्शन वेळोवेळी घडताना दिसतेयं. त्याची साक्ष देणारा एक फोटो मीराबाईने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा जिंकल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर तिने आज घरच्या जेवणाचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

मणिपूरच्या खेड्यात जन्मलेली मीराबाई गेली अनेक वर्ष वेटलिफ्टिंग स्पर्धेत आपले नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करत होती. मीराबाईचा ऑलिम्पिक मेडल पटकवण्याचा प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता. अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये विजय मिळत ती ऑलिम्पिकमध्ये दाखल झाली. या स्पर्धेनिमित्त मीराबाईला स्ट्रीक डाईट प्लान फॉलो करावा लागत असल्याने तिला अनेकदा घराचा जेवनापासून दूर राहावे लागत होते. मात्र ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक कमावत तिने दोन वर्षांनंतर आज घराच्या जेवणाचा आस्वाद घेतला. याचा एक फोटो मीराबाई चानूने आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोवर कॅप्शन देत मीराबाईने लिहिले की, ‘अखेर २ वर्षानंतर घरचं जेवण जेवून खरा आनंद मिळाला.’

- Advertisement -

यापूर्वीही मीराबाईचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमधूनही मीराबाईचं साधेपणाचे चित्रण घडले आहे. आज जगभरात मीराबाईचं नाव गाजत असलं तरी मीराबाईने साधेपणा जपत पुढे वाटचाल करताना दिसत आहे. यात फोटोत मीराबाई जमिनीवर जेवून अगदी साध्यापद्धतीने जेवताना दिसली.

- Advertisement -

‘बॅक टू स्कूल’चे चित्रीकरण पूर्ण, चित्रपटात निशिगंधा वाड यांच्यासह कलाकारांची मोठी फौज


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -