अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. या पराभवाचा खेळाडूंना नाही तर भारतीय चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. मात्र या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शने ट्रॉफीसोबत लाजिरवाणे कृत्य केले आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांकडून टीका होताना दिसत आहे. (Mitchell Marsh Players embarrassing act with trophy after winning match Storm trolls on social media)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतावर सहा विकेट्सने विजय मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शने प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीचा अनादर केला. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका फोटो मिचेल मार्श ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला दिसला. त्यामुळे क्रिकेट चाहते त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. मिचेल मार्शने भारताविरुद्धच्या सामन्यात 15 धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने त्याला केएल राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. मात्र विजयानंतर मिचेल मार्श ड्रेसिंग रूममध्ये ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला दिसला.
हेही वाचा – Travis Head : रोहित शर्माबाबत ट्रॅव्हिस हेडचे विधान चर्चेत; सामना जिंकल्यानंतर काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मिशेल मार्शचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो विश्वचषक 2023 च्या ट्रॉफीवर पाय आणि हातात ड्रिंक घेतलेला दिसत आहे. यामुळे भारतीय चाहते दुखावले गेले असून त्यांनी मिचेल मार्शला चांगलेच फटकारले आहे. काही क्रिकेट चाहत्यांनी असेही म्हटले की, हा त्यांचा दिवस आहे आणि ही त्यांची ट्रॉफी आहे म्हणून ते त्यांना हवे तसे वापरू शकतात. त्यांना हवे असल्यास ते त्यावर लघवी करून पायाखाली चिरडून टाकू शकतात. तथापि, अशा प्रकारे ट्रॉफीशी वागणे सामान्यतः योग्य मानले जात नाही.
Mitchell Marsh with the World Cup. pic.twitter.com/n2oViCDgna
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 20, 2023
दरम्यान, सामना संपल्यानंतर अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छायाचित्रे पाहिली आहेत. ज्यात काही खेळाडूंनी ट्रॉफीला डोक्यावर धरले आहे तर, ट्रॉफीचे चुंबन घेताना दिसत आहेत. याआधी महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन झोपताना दिसला आहे, पण असे कृत्य करणे चुकीचे आहे. आपल्या संस्कृतीत काहीही झाले तरी असे वागणे कोणालाही सहन केले जाणार नाही. याच कारणामुळे
अरविंद चोटिया नावाच्या युजरने ट्विटरवर लिहिले की, “पश्चिमांत्य लोक नक्कीच विकसित झाले, पण त्यांना सभ्यता आली नाही. ज्या ट्रॉफीला डोक्यावर मिरवले जाते, तिला पायाखाळी पाहून नक्कीच वाईट वाटत आहे, पण आपण काय करू शकतो? दुसऱ्या एका युझर्सने लिहिले की, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीसह आहे. त्याने ट्रॉफी जिंकली, पण सन्मान नाही जिंकला.” इंद्रा नावाच्या एका युझर्सने लिहिले की, अशा व्यक्तीला ट्रॉफी मिळाली आहे, ज्याची लायकी नाही, जसे की मिचेल मार्श आणि ज्यांना ट्रॉफी मिळाली नाही, जसे की विराट कोहली आणि रोहित शर्मा.”
हेही वाचा – WC 2023 Final : संजय मांजरेकरांमुळे भारत हरला? युझर्सची टीका, अहमदाबादच्या प्रेक्षकांवरही राग अनावर
ऑस्ट्रेलियाने सहा वेळा पटकावले विजेतेपद
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद फक्त 240 धावाच करू शकला. या धावांचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि मार्नस लॅबुशेनच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 अशाप्रकारे सहा वेळा विश्वचषक जिंकला आहे.