घरक्रीडाIPL 2021 : मिचेल मार्शची माघार; इंग्लंडचा 'या' खेळाडूने पटकावली हैदराबाद संघात जागा

IPL 2021 : मिचेल मार्शची माघार; इंग्लंडचा ‘या’ खेळाडूने पटकावली हैदराबाद संघात जागा

Subscribe

मार्श वैयक्तिक कारणांमुळे यंदा आयपीएल स्पर्धेत खेळणार नाही.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मात्र, या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी काही दिवस सनरायजर्स हैदराबाद संघाला धक्का बसला आहे. सनरायजर्सचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तो वैयक्तिक कारणांमुळे यंदा आयपीएल स्पर्धेत खेळणार नाही. त्याची जागा घेण्यासाठी सनरायजर्सने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयची संघात निवड केली आहे. ‘मिचेल मार्शने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलच्या संपूर्ण मोसमातून माघार घेतली असून त्याची जागा घेण्यासाठी सनरायजर्स हैदराबादने इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयला संघात स्थान दिले आहे,’ अशी माहिती आयपीएलच्या ट्विटरवर देण्यात आली.

- Advertisement -

रॉयच्या ८ सामन्यांत १७९ धावा

मार्शने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत २१ सामने खेळले असून त्यात २२५ धावा करताना २० विकेट घेतल्या आहेत. मागील मोसमात पहिल्याच सामन्यात मार्शला दुखापत झाली. त्यामुळे त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागले होते. आता त्याने वैयक्तिक कारणांमुळे यंदाही आयपीएल स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघात जेसन रॉय आता मार्शची जागा घेईल. रॉयने आतापर्यंत ८ आयपीएल सामने खेळले असून त्यात १७९ धावा केल्या आहेत. यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा इंग्लंड एकदिवसीय संघातील सलामीचा साथीदार जॉनी बेअरस्टोसुद्धा सनरायजर्स संघाकडून खेळतो.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -