आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मिताली राजची निवृत्ती

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) आज(बुधवार) सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ( international cricket  ) निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत मितालीने सोशल मीडियावर (Emotional post on social media) भावुक पोस्ट केली आहे. तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! मी तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनासह माझ्या दुसऱ्या डावाची सुरुवात करत आहे, असं ट्विट मितालीने केलं आहे. यासह मितालीने तिच्या २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला (Career) अलविदा केला आहे.

चाहत्यांना ट्विट करून दिली माहिती

मिताली राजने वयाच्या ३९ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. मिताली राजने ट्विट करून लिहिले की, जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता. गेली २३ वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे. मला मिळालेल्या सर्व पाठिंब्याबद्दल मी बीसीसीआय आणि श्री जय शाह सर यांचे आभार मानू इच्छिते, असं मितालीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मिताली राजची क्रिकेट कारकीर्द

मिताली राज ही भारताची सर्वात यशस्वी महिला फलंदाज आहे. भारतासाठी तिने १२ कसोटी सामन्यांमध्ये ४३.६८च्या सरासरीने ६९९ धावा केल्या. मिताली राजने टीम इंडियासाठी २३२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने ७ हजार ८०५ धावा केल्या होत्या. मिताली राजच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ६४ अर्धशतकं आणि ७ शतकं आहेत. तसेच टी-२० मध्ये १७ अर्धशतकं झळकावले आहेत.

हेही वाचा : टीम इंडियापेक्षा मिताली मोठी कशी?

मिताली राजचे रेकॉर्ड काय?

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. मिताली राजने १५५ एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे, त्यापैकी ८९ सामने जिंकले आणि ६३ सामने गमावले आहेत.


हेही वाचा : विद्यार्थ्यांचा कल आणि आवडीनुसार शैक्षणिक कारकिर्दीची पुढील दिशा पालकांनी ठरवावी : उपमुख्यमंत्री