घरक्रीडाभारतीय महिला खेळाडूला सलाम; बाळाला दूध पाजण्यासाठी घेतला ब्रेक

भारतीय महिला खेळाडूला सलाम; बाळाला दूध पाजण्यासाठी घेतला ब्रेक

Subscribe

हा फोटो व्हायरल झाल्यामुळे मिझोराम क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमविया रॉयटे यांनी १० हजार रुपयांचे बक्षीस दिले.

सोशल मीडियावर या फोटोने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे. मिझोराम येथील एका व्हॉलिबॉल खेळाडूचा हा स्तनपान करतानाचा फोटो आहे. व्हॉलिबॉलचा सामना सुरू असताना या खेळाडूने आपल्या सात महिन्यांच्या बाळाला ब्रेक घेऊन स्तनपान दिलं आहे. हा फोटो फेसबुक युझर निंगलून हंघल हिने शेअर केला आहे. तिने शेअर करताना लिहिलं की, हा फोटो लिंडा छकछुक यांनी काढला आहे. या फोटोतील व्हॉलीबॉल खेळाडूचे नाव लॅलव्हेंटलुआंगी आहे. ती टुईकूम व्हॉलीबॉल संघातील खेळाडू आहे. लॅलव्हेंटलुआंगी ही तिच्या सात महिन्यांच्या बाळाला घेऊन खेळाडूंच्या शिबिरात आली होती. बाळाला भुक लागल्यामुळे लॅलव्हेंटलुआंगी हिने सामन्या दरम्यान ब्रेक घेतला आणि बाळाला स्तनपान दिलं. या दरम्यानचाच हा फोटो आहे.

हा मिझोराम राज्यस्तरीय २०१९ स्पर्धेचा सामना होता. लॅलव्हेंटलुआंगी हिला मिझोराम क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमविया रॉयटे यांनी हा फोटो व्हायरल झाल्यानंतर १० हजार रुपयांचे बक्षीस दिले. नेटकऱ्यांनी लॅलव्हेंटलुआंगी हिची खेळाडू आणि आई म्हणून जबाबदारीबाबत देखील कौतुक केले आहे.

- Advertisement -

A stolen moment to feed her 7 month old baby in between a game was captured making it the picture mascot of the Mizoram…

Ninglun Hanghal ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 9, 2019

एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘आई ही आई असते. नेहमीच ती मुलांसाठी कर्तव्यदक्ष असते.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने फोटोग्रोफर आणि स्तनपान करणाऱ्या आईचे कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर नेहमीच सार्वजनिक ठिकाणी स्तनपान देतानाचे आईचे फोटो चर्चेत असतात. अनेक अशा आईना पाठिंबा देतात. मात्र काही जण याला विरोध करतात.

- Advertisement -

हेही वाचा – ‘वाडा’ने घातली रशियावर चार वर्षांची बंदी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -