घरक्रीडासंघर्षचा महिला संघ अंतिम फेरीत

संघर्षचा महिला संघ अंतिम फेरीत

Subscribe

आमदार चषक कबड्डी स्पर्धा

मुंबई , संघर्ष क्रीडा मंडळाने नव महाराष्ट्र संघाने मुंबई उपनगर कबड्डी असो. च्या मान्यतेने संस्थापक स्व. अशोक कदम यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुषांत स्वस्तिक मंडळ, स्फूर्ती मंडळाने उपांत्य फेरी गाठली. गोराई येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात गोरेगावच्या संघर्ष क्रीडा मंडळाने बोरिवलीच्या ओम नव महाराष्ट्र मंडळाला ३९-१७ असे सहज नमवित अंतिम फेरीत धडक दिली.

पुरुषांच्या उपांत्य पूर्व फेरीच्या चुरशीच्या सामन्यात कुर्ल्याच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने मध्यांतरातील ५-६ अशा पिछाडीवरून सह्याद्री क्रीडा मंडळाचा प्रतिकार २०-१५ असा हाणून पाडला. मध्यांतरापर्यंत सावधपणे खेळला गेलेल्या या सामन्यात मध्यांतरानंतर मात्र चुरस पहावयास मिळाली. यात स्वस्तिकने टॉप गिअर टाकत बाजी मारली. दुसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात स्फूर्ती क्रीडा मंडळाने नवमहाराष्ट्र संघाचा २३-१५ असा पाडाव करीत उपांत्य फेरी गाठली. या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्कर्ष मंडळाने पार्ले स्पोर्ट्सला १५-१२ असे, तर स्वयंभू क्रीडा मंडळाने सागर क्रीडा मंडळाला ३३-१६असे नमवित आगेकूच केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -