घरIPL 2020ऑनलाईन शॉपिंगसाईटनंतर मनसेची IPL मध्ये मराठीतून समालोचनाची मागणी

ऑनलाईन शॉपिंगसाईटनंतर मनसेची IPL मध्ये मराठीतून समालोचनाची मागणी

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आयपीएलकडे मोर्चा वळवला आहे. आयपीएलचे समालोचनही मराठीत असावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅमेझॉन अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यासंदर्भात मनसेने अॅमेझॉन कंपनीला दणका दिला होता. यासंबंधी कंपनीनेही त्यांनी मागणी मान्य करत मराठी अॅप बनवण्याचे कळवले. आता मनसेने डिस्ने हॉटस्टारला आयपीएलचे समालोचन मराठी व्हावे, याकरता पत्र पाठवले आहे. यासंदर्भातील माहिती मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये 

क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठी भाषेत का नसावी? महाराष्ट्रात एकापेक्षा एक असे उत्तम समालोचक (Commentator) आहेत. गरज असल्यास आम्ही शोधून देऊ, अशी ऑफरही केतन यांनी कंपनीला दिली आहे.

- Advertisement -

हॉटस्टार डिस्नेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतर प्रदेशिक भाषांप्रमाणे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी कंपनीला मनसेने पत्राद्वारे केली आहे. सध्या आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध असून अ‍ॅपमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आलेला नाही. आपल्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. त्याचप्रमाणे आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग हा मराठी आहे, असे असतानाही तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे, अशा शब्दात मनसेने कंपनीला खडेबोल सुनावले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

लवकरच सर्वांसाठी रेल्वे धावणार; आज राज्य सरकार आणि रेल्वेची बैठक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -