Mohammad Amir in IPL 2026 मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2025 (आयपीएल) या स्पर्धेचे यंदा 18वं वर्ष आहे. आयपीएलच्या 18 व्या पर्वाची सुरूवात 22 मार्चपासून होणार आहे. या आयपीएलसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत असून, क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. या आयपीएलला आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या 18 व्या पर्वातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. अशात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यानुसार, पाकिस्तानचा माजी वेगवाग गोलंदाज मोहम्मद आमिर आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची चर्चा सुरू आहे. (Mohammad Amir on IPL 2026 will be eligible to play after getting UK citizenship)
पाकिस्तान वगळता सर्व संघांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. अशात माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमिरने आयपीएल 2026 मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, आमिर हा लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. आता, आयपीएलमध्ये खेळण्याबद्दल, मोहम्मद आमिरने ‘हारना मन है’ या शोमध्ये म्हटले की, “पुढच्या वर्षी मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि जर मला संधी मिळाली तर मी आयपीएलमध्ये खेळेन”, असे त्याने म्हटले आहे. शिवाय, “आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास आरसीबीकडून खेळायला आवडेल”, असेही आमिर म्हणाला.
🚨 MOHAMMAD AMIR IN IPL. 🚨
– Amir confirms he’ll be eligible to play in the IPL from 2026. pic.twitter.com/9B677YUvow
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर ब्रिटनमध्ये राहतो आणि त्याच्यामार्फत तो ब्रिटिश पासपोर्ट मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. जर त्याला पासपोर्ट मिळाला तर तो ब्रिटिश नागरिक होईल. जर असे झाले तर तो आयपीएल खेळण्यास पात्र मानला जाईल.
दरम्यान, आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली. पहिल्या सत्रात 11 पाकिस्तानी खेळाडूंनी भाग घेतला होता. ज्यामध्ये 4 खेळाडू केकेआरकडून, 3 राजस्थानकडून, 2 दिल्लीकडून आणि प्रत्येकी 1 खेळाडू आरसीबी आणि डेक्कन चार्जर्सकडून खेळला. या खेळाडूंमध्ये सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हाफीज, उमर गुल, कामरान अकमल, युनूस खान, सोहेल तन्वीर, मोहम्मद आसिफ, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह-उल-हक यांचा समावेश आहे.
हेही वाचा – Pakistan Cricket : पराभवानंतर पाकिस्तानच्या लाथाड्या, आजी माजी क्रिकेटपटू भिडले