ICC Awards: आयसीसीकडून सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूची घोषणा, पाकिस्तानी खेळाडूची दमदार कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम पुरूष टी-२० संघाची घोषणा केली आहे. यामध्ये पाकिस्तानचा दमदार खेळाडू आणि सलामवीर फलंदाज मोहम्मद रिझवानला २०२१ वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरूष टी-२० क्रिकेटपटू म्हणून गौवरण्यात आलंय. रिझवानने २०२१ साली टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. गेल्या वर्षी त्याने २६ डावांमध्ये ७३.६६ च्या सरासरीने १ हजार ३२६ धावा काढल्या आहेत. तसेच त्याने एक शतक आणि १२ अर्धशतकं झळकावली आहेत.

मागील वर्षात रिझवाने शानदार फलंदाजी करत पाकिस्तान आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये सेमी फायनलच्या सामन्यात त्याने उडी मारली. रिझवानने फक्त २९ सामन्यांमध्ये ७३.६६ च्या सरासरीत १३४.८९ च्या स्ट्राईक रेटनुसार १३२६ धावा काढल्या. आयसीसीने केलेल्या घोषणेमध्ये भारतीय संघाच्या एकाही खेळाडूचा समावेश नव्हता. यावेळी बाबर आझमला कर्णधार आणि मोहम्मद रिझवानला यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे.

टूर्नामेंटसाठी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणार क्रिकेटपटू रिझवान ठरला आहे. २०२१ साली लाहोरमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिलं शतक झळकावलं होतं आणि कराचीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम सामन्यात ८७ धावा काढल्या होत्या.

आगामी वर्षात आणखी एक टी-२० विश्वचषक होणार आहे. रिझवान ही कामगिरी आणि खेळी अशीच कायम ठेवेल, अशी आशा पाकिस्तानला आहे.रिझवानने टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाविरूद्ध ५५ बॉल्समध्ये ७९ धावा काढल्या. पाकिस्तानला या जागतिक स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद करण्यात आली.


हेही वाचा : Virat kohli captaincy : विराट कोहलीला कर्णधारपद सोडायला भाग पाडले, शोएब अख्तरचा गंभीर आरोप