‘भगवान राम तुमचे जीवन भरभराट…’ दसऱ्याच्या शुभेच्छा देताच शमीला कट्टरवाद्यांकडून ठार मारण्याची धमकी

विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी भारतीय नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय संघातील खेळाडू मोहम्मद शमी यानेही देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, शमीने दिलेल्या या शुभेच्छांनंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी भारतीय नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय संघातील खेळाडू मोहम्मद शमी यानेही देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, शमीने दिलेल्या या शुभेच्छांनंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शमीला कट्टरवाद्यांकडून जीवे मारण्याचे फोन आल्याचे सांगितले जात आहे. (Mohammed Shami Dussehra Islamic Fundamentalism Social Media)

दसऱ्यानिमित्त मोहम्मद शमीनेही देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. मोहम्मद शमीने सोशल मीडियावर भगवान रामाने रावणाचा वध करतानाचा एक फोटो पोस्ट केला, ज्यात ‘हॅपी दसरा’ अशा शब्दांत आहे. फोटोसोबत “दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर, मी प्रार्थना करतो की भगवान राम तुमचे जीवन भरभराट, यश आणि आनंदाने भरून जावो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा”, असेही त्यांनी ट्विट केले.

मोहम्मद शमीच्या याच ट्वीटनंतर कट्टरवाद्यांकडून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते. मोहम्मद शमीने दसऱ्याच्या शुभेच्छा देताच कट्टरवाद्यांनी त्याला खडसावले. त्याने शमीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक कट्टरपंथीयांनी “अकील भाटी नावाच्या ट्विटर हँडलने लिहिले, शमीला लाज वाटली. तू मुस्लिम आहेस का?”, असे म्हटले. शिवाय, हसन मंजूर नावाच्या ट्विटर हँडलने लिहिले की, अल्लाहशिवाय कोणीही देव नाही हे माहीत असताना, तुम्ही मुस्लिम असूनही असे कसे म्हणू शकता?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.


हेही वाचा – IND vs SA : पावसाच्या सावटामुळे पहिल्या वनडे सामन्याच्या वेळेत बदल