घरक्रीडा'तेव्हा फक्त राहुल गांधी शामीसोबत उभे होते...' राहुल गांधींचे 'ते' जुने...

‘तेव्हा फक्त राहुल गांधी शामीसोबत उभे होते…’ राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्वीट व्हायरल

Subscribe

भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करून ICC विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाच्या या विजयात भारतीय फलंदाजंसोबतच वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीचेही विशेष योगदान आहे. दरम्यान शामीबाबत काँग्रेस नेते राहुल यांधी यांचे जुने ट्वीट सोशल मिडीया वर व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते बी. व्ही. श्रीनिवासन यांनी राहूल गांधी यांचे दोन वर्षांपूर्वी केलेली पोस्ट शेअर केली आहे. त्यात राहुल गांधी यांनी म्हटलं की, मोहम्मद शामी आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. हे लोक द्वेषाने भरलेले आहेत कारण त्यांच्यावर कोणी प्रेम करत नाही. त्यांना माफ करा.

- Advertisement -

ही पोस्ट रिपोस्ट करत श्रीनिवास यांनी लिहिले की, ” काही वर्षांपूर्वी जेव्हा हिंदू-मुस्लिम भाविक भांग पिऊन मोहम्मद शामीला  शिवीगाळ करत होते, त्यावेळी फ्कत राहुल गांझी शामीसोबत उभे होते.”


ऑक्टोबर २०२१ मध्ये पारपडलेल्या t20 विश्वचषकात भारत पाकिस्तान विरूध्द हरला होता, त्यावेळी सोशल मीडियावर शामीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्याच्या धर्मावर लक्ष्य केले. जरी अशा अनेक पोस्ट शेअर होत होत्या. शामीला ट्रोल करणारे ट्विटर हँटल पाकिस्तानचे होते. परंतु ते भारतीय नावाने पोस्ट केले जात होते. राहुल गांधींव्यतिरिक्त, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह राजकारण्यांनी ट्रोलिंगचा निषेध केला होता, आणि शामीचे समर्थन केले होते.

- Advertisement -

 

बुधवारी शमीच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. पंतप्रधान नेरंद्र मोदीं देखील शमीचे अभिनंदन केले. ट्विट करत मोदींनी शामीचे अभिनंदन केले. त्यात त्यांनी म्हटलं की, आजचा सेमी फायनल चा सामना आणखीनच खास बनला आहे.
“आजचा उपांत्य फेरीचा सामना आणखी खास बनला तो वैयक्तिक कामगिरीमुळे. मोहम्मद शामीची शानदार गोलंदाजी क्रिकेट चाहत्यांच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. शमी चांगला खेळला!”

राहुल गांधी यांनी शामीचे कौतुक केले आहेत, ते म्हणाले की, “मॅन ऑफ द मॅच मोहम्मद शामीची शानदार गोलंदाजी! त्याच्या सातत्यपूर्ण सामना जिंकणाऱ्या कामगिरीने तो या विश्वचषकात एक उत्कृष्ट खेळाडू बनला आहे.”

न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेतल्या

याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने न्यूझीलंडला 397 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. कर्णधार रोहित शर्माने 29 चेंडूत 47 धावा केल्या. शुभमनने 80, गिलने 80 आणि कोहलीने 80 धावा केल्या. श्रेयस अय्यरने शानदार शतक झळकावले. कोहली 113 चेंडूत 117 धावा करून बाद झाला, तर श्रेयसने स्फोटक फलंदाजी करत 70 चेंडूत 105 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये केएल राहुलने 20 चेंडूत 39 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्यानंतर मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत 57 धावांत 7 बळी घेतले. या विश्वचषकात शमीने सहा सामन्यांत २३ बळी घेतले असून या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -