IND vs BAN Match Live दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होत आहे. या सामन्यात बांगलादेशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 229 धावांचे लक्ष्य भारतीय संघासमोर ठेवले आहे. पण या सामन्यात दोन्ही संघाकडून अफलातून खेळी झाल्याचे पाहायला मिळालं. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने पाच विकेट्स घेतल्या. तसेच, बांगलादेशकडून टोव्हीद हृदॉय याने शतकी खेळी केली. त्यामुळे हा सामना अतीतटीचा झाला आहे. (Mohammed Shami takes five Wickets india vs bangladesh champions trophy 2025 live score updates)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या अ गटातील संघ असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला सामना आज (20 फेब्रुवारी) होत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाला चांगली सुरूवात करता आली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सामन्याच्या सुरूवातीचे षटक टाकले. पहिल्याचं षटकात विकेट घेतली. त्यानंतर सामन्यातील 10 षटकांमध्ये 53 धावसंख्या देत 5 विकेट्स घेतल्या.
What a start to the #ChampionsTrophy 2025 for Mohammad Shami 👏#BANvIND ✍️: https://t.co/zafQJUBu9o pic.twitter.com/VOVZtEMjWn
— ICC (@ICC) February 20, 2025
वनडे वर्ल्डकप 2023 मधील फॉर्मसह मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उतरला आहे. शमीने बांगलादेशविरूद्ध पहिल्या सामन्यात 3 विकेट्स घेत मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. वर्ल्डकपनंतर आपली पहिली आयसीसी टूर्नामेंट खेळणाऱ्या शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाच्या पहिल्याच सामन्यात 3 विकेट घेत वनडे क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण केले आहेत. यासह हा पराक्रम करणारा तो सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे.
12 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या शमीने अखेरीस हा टप्पा गाठलाच. पहिल्याच षटकात विकेट घेत या विक्रमाकडे एक पाऊल टाकले. त्यानंतर चौथ्या षटकात शमीनेही आश्चर्यकारक कामगिरी केली आणि बांगलादेशची तिसरी विकेट मिळवली, तर त्याच्या खात्यात दुसरी विकेट मिळवली.
मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेत 200 विकेट्स पूर्ण केले आहेत. शमी तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी चेंडूत 200 विकेट्स पूर्ण करणारा गोलंदाज बनला आहे आणि त्याने मिचेल स्टार्कचा विश्वविक्रम मोडला आहे. शमीने 5126 चेंडूत 200 वनडे विकेट घेतल्या आहेत. तर स्टार्कने 5240 चेंडूत ही कामगिरी केली. आता शमीने सर्वात कमी चेंडूंमध्ये 200 वनडे विकेट घेण्याच्या बाबतीत जगभरातील सर्व गोलंदाजांना मागे टाकले आहे आणि पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय संघ प्लेइंग -11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हर्षित राणा.
बांगलादेश संघ प्लेइंग 11 : तन्जीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्कीन अहमद, तन्झीम हसन साकिब, मुस्तफिजूर रहमान.
हेही वाचा – IND vs BAN Live Score : हृदॉय, जेकर यांची अर्धशतकी खेळी; भारतीय गोलंदाजांचे सहाव्या विकेटसाठी प्रयत्न सुरूच