घरICC WC 2023Mohammed Shami : "तेरे नाम से ही..."; शमीच्या शानदार गोलंदाजीनंतर पत्नी हसीन...

Mohammed Shami : “तेरे नाम से ही…”; शमीच्या शानदार गोलंदाजीनंतर पत्नी हसीन जहाँचे खास रिल

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या धारदार गोलंदाजीने कहर केला आहे. त्याने या स्पर्धेत फक्त 6 सामने खेळताना 23 विकेट घेत एक नंबरचा गोलंदाज बनला आहे. शमी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यानंतर नवनवे विक्रम करत आहे. शमीने तीन सामन्यांत प्रत्येकी पाच विकेट घेतल्या आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात 7 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. शमीच्या शानदार गोलंदाजीनंतर त्याची पत्नी हसीन जहाँ हिने सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकली, ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. (Mohammed Shami Tere Naam Se Hi Wife Haseen Jahans special reel after Mohammed Shamis stunning bowling)

हेही वाचा – …म्हणून त्याला गोलंदाजीपासून रोखावे लागले; प्रशिक्षक बदरुद्दीनकडून मोहम्मद शमीबाबत अनेक गुपिते उघड

- Advertisement -

मोहम्मद शमीच्या शानदार गोलंदाजीनंतर हसीन जहाँने ‘तेरे नाम से ही मुझको दुनियावाले जानेगे’ या गाण्यावर रिल बनवली आहे. हसीन या गाण्याच्या ट्यूनला लिप सिंक करताना दिसत आहे. या रीलच्या कॅप्शनमध्ये हसीनने ‘प्युअर लव्ह’ असे लिहिले आहे. हसीन जहाँची ही रिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Haseen Jahan (@hasinjahanofficial)

- Advertisement -

शमीच्या चाहत्यांनी केले ट्रोल 

हसीन जहाँच्या पोस्टमध्ये शमीच्या चाहत्यांकडून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. एका चाहत्याने लिहिले, पुढचे लक्ष्य 10 विकेट्स आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले, शमीसमोर कोणी बोलू शकते का? दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ज्याला बायकोचे दडपण नसते तो खूप वेगाने चेंडू टाकतो, उदा. आता मोहम्मद शमीकडे बघा.’ तिसऱ्या यूजरने लिहिले – ‘तुम्हाला खूप पश्चाताप होत असेल ना?’ तर काहींनी विकेट घेतल्यानंतर शमीच्या सेलिब्रेशनशी संबंधित व्हिडिओही पोस्ट केले.

हेही वाचा – IND vs NZ : महेंद्रसिंग धोनीचे 10 वर्ष जुने ट्वीट होतेय व्हायरल; रवींद्र जडेजाबद्दल असे काय म्हटले?

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँचा अद्याप घटस्फोट नाही

दरम्यान, मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ हे फार पूर्वीपासून वेगळे झाले आहेत. पण अद्याप या दोघांचा घटस्फोट झालेला नाही. अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयापासून मीडिया ट्रायलपर्यंत पोहोचले आहे. निर्धारित अटींनुसार, शमी दरमहा 1 लाख 30 हजार रुपये पत्नीला देतो आणि त्यापैकी 80 हजार रुपये तो आपल्या मुलीच्या संगोपनासाठी देतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -