Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Mohammed Shami : पत्नीने वेश्यांसोबत संबंधांचा शमीवर केला आरोप

Mohammed Shami : पत्नीने वेश्यांसोबत संबंधांचा शमीवर केला आरोप

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) अडचणीत वाढून होऊ शकते. कारण त्याची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिने वेश्यांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत अटकेची मागणी केली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाच्या सत्र न्यायालयाने  मोहम्मद शमीविरुद्ध अटक वॉरंटला स्थगिती दिली होती. या स्थगितीला हसीन जहाँने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हसीन जहाँचे वकील दीपक प्रकाश, नचिकेत वाजपेयी आणि दिव्यांगना मलिक वाजपेयी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, शमी तिच्याकडून हुंडा मागायचा आणि परदेश दौऱ्यावर वेश्यांसोबत अवैध संबंध ठेवायचा.

- Advertisement -

हसीन जहाँने आरोप केला आहे की, भारतीय दौऱ्यावर बीसीसीआयने दिलेल्या हॉटेल रूममध्ये शमीने वेश्यांसोबत अवैध संबंध ठेवायचा. शमी जेव्हा परदेश दौऱ्यावर असायचा तेव्हा तो मुलींना बीसीसीआयने दिलेल्या हॉटेलच्या रूममध्ये बोलावत असे. तो आजही वेश्यांसोबत बोलतो, त्यांच्या सोबत संबंध सांभाळण्यसाठी तो दुसऱ्या मोबाईल नंबरचा वापर करतो. हसीन जहाँच्या याचिकेत म्हटले आहे की, कोणत्याही सेलिब्रिटीला कायद्यानुसार मोहम्मद शमीला विशेष दर्जा मिळू नये. न्यायालयाचा हा आदेश कायद्यात स्पष्टपणे चुकीचा आहे, जे जलद खटल्याच्या अधिकाराला महत्त्व देते. क्रिकेटपटूच्या बाबतीत चार वर्षांपासून केसमध्ये प्रगती झाली नसल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान हसीन जहाँने 2018 मध्ये पहिल्यांदा शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर घरगुती हिंसाचार आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी शमीने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये कोलकाता न्यायालयाने शमीने हसीन जहाँला दर महिन्याला 50,000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही हसीन जहाँचा शमीवरचा राग काही कमी झाला नाही. तिने दरमहा 10 लाखांची मागणी केली. त्यामुळे शमीला कायदेशीर लढाईचा सामना करावा लागला. या काळात त्याला पोलीस चौकशी आणि वॉरंटलाही सामोरे जावे लागले होते.

- Advertisement -

या प्रकरणी अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टाने 29 ऑगस्ट 2019 रोजी शमीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. शमीने या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले, ज्याने अटक वॉरंट आणि संपूर्ण प्रकरणातील पुढील कार्यवाहीला स्थगिती दिली. यानंतर हसीन जहाँने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु उच्च न्यायालयानेही अटक वॉरंटवरील स्थगिती उठवण्यास नकार दिला.

 

 

 

 

- Advertisment -