घरक्रीडाशमीच्या बायकोने शेअर केला पार्टीतला व्हिडिओ, नेटकऱ्यांनी केलं टार्गेट!

शमीच्या बायकोने शेअर केला पार्टीतला व्हिडिओ, नेटकऱ्यांनी केलं टार्गेट!

Subscribe

हसीनाने नुकताच एका पार्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे नेटकरी तीच्यावर चांगलेच चिडले आहेत.

क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची बायको हसीन जहां २०१८ पासून वेगळे रहात आहेत. कारण २०१८ मध्ये हसीन जहांने आपल्या क्रिकेटर पतीवर म्हणजेच शमीवर आरोप लावले होते. शमीचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध आहेत असा आरोप तीने केला होता. हसीनाने फेसबुकवर काही स्क्रीन शॉट शेअर केले होते, आणि तीचं म्हणणं होतं की, मोहम्मद शमीचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध आहेत. मात्र शमीने या आरोपात कोणतही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं.

- Advertisement -

हसीन जहां ही सोशल मीडियावर खूप अऍक्टीव्ह असते. ती नेहमी आपले व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या संपूर्ण देशात कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. ज्यामुळे लोकं घरातून बाहेर निघू शकत नाहीयेत. त्यामुळे लोकांचं भटकणं, पार्ट्या सगळच बंद झालं आहे.

- Advertisement -

हसीनाने नुकताच एका पार्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे नेटकरी तीच्यावर चांगलेच चिडले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना ‘जगाची काळजी कशाला करायची…..’ असं कॅप्शन तीने दिलं आहे. या व्हिडिओत हसीना एखा पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे. हसीनाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी तीला आपल्या पतीचं नाव खराब करू नकोस असा सल्लाही दिला आहे.

View this post on Instagram

choti si mamma meri??

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial) on

मोहम्मद शमीची मुलगी ही आपल्या आई बरोबर म्हणजेच हसीनाबरोबर राहते. हसीना आपल्या मुलीबरोबर नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -