हसीनने शेअर केलेल्या भुताच्या व्हिडिओवर, नेटकरी म्हणाले ‘नमाजची खिल्ली उडवू नकोस’

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली.

mohammed shami wife hasin jahan share horror video on social media
हसीनने शेअर केलेल्या भुताच्या व्हिडिओवर, नेटकरी म्हणाले 'नमाजची खिल्ली उडवू नकोस'

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती नेहमीच चर्चेत असते. आता हसीनने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान तिने सोशल मीडियावर एक भुताचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, ‘तुम्ही लोक खूप वाईट आहात, असे व्हिडिओ तयार करता आणि तुम्ही देखील वाईट आहात जे असे व्हिडिओ मला पाठवतात.’

हसीनने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लोकांनी अनेक वेगवेगळे तिला सल्ले दिले. या व्हिडिओमध्ये भूत असणारी व्यक्ती नमाज पठण करताना दिसत आहे. अचानक ती नमाज पठण करत असताना भूत होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून एक युजर म्हणाला की, ‘कृपया नमाजची खिल्ली उडवू नकोस.’ तर अजून एका युजरने लिहिले की, ‘सर्वात जास्त वाईट तुम्ही आहात, जो हा व्हिडिओ शेअर करीत आहात.’

काही दिवसांपूर्वीच हसीन सोशल मीडियावर तिच्या फोटोमुळे ट्रोल झाली होती. तेव्हा तिने फोटो शेअर करता लिहिले होते की, ‘आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी तुमची सुरुवात लढाई आहे. स्वप्ने पाहण्याची हिम्मत करा, प्रयत्न करण्याची हिम्मत करा, हारण्याची हिम्मत करा आणि यशस्वी होण्याची हिम्मत करा.’ तेव्हा एक युजर म्हणाला की, ‘अशाप्रकारे किती पोस्ट तू टाकली तरी, शमी भाई तुझ्या जाळ्यात फसणार नाही.’ गेले काही वर्ष शमी आणि हसीन वेगळे राहत आहेत.


हेही वाचा – इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे शमीची पत्नी ट्रोल