Virat Kohli Test Captaincy: तू माझा मोठा भाऊ…विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद सिराज झाला भावूक

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन कसोटी मालिकांचा सामना रंगला. परंतु तिसरा कसोटी सामना टीम इंडियाने गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राजीनामा दिल्यानंतर विराटने ट्विट करत सोशल मीडियावर आपला निर्णय जाहीर केला. मात्र, तू माझा मोठा भाऊ आहेस अशी भावनिक पोस्ट टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने केलीय.

मोहम्मद सिराजने इंन्स्टाग्रामवर लिहिलं की, माझा सुपरहिरो, तुझ्याकडून मिळालेला पाठिंबा आणि प्रोत्साहनाबाबत मी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. तू नेहमीच माझा मोठा भाऊ आहेस. इतकी वर्षे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तू नेहमीच माझ्यासाठी कर्णधार किंग कोहली राहशील.

विराट कोहली ट्विटमधून काय म्हणाला?

संघाला योग्य दिशेने नेण्यासाठी सात वर्षांची मेहनत आणि अथक परिश्रम घेत मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आणि तिथे काहीही कमी पडू दिले नाही. प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. आणि माझ्यासाठी भारताचा कसोटी कर्णधार म्हणून आता थांबण्याची वेळ आलीय. मला माझ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाचा आभारी आहे. त्या सर्व सहकाऱ्यांचे ज्यांनी पहिल्या दिवसापासून मला पूर्ण पाठिंबा दिला. परिस्थिती कशीही असो मी कधीही हार मानली नाही, असं विराटने राजीनामा देत आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.

दरम्यान,टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. यामध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. त्यानंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९ जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. वनडे मालिकेचा पहिला सामना पार्ल येथील बोलंड पार्क येथे खेळवला जाणार आहे.


हेही वाचा : IPL 2022 : आयपीएलच्या लिलावातून ऑलराऊंडर बेन स्टोक्स आऊट, जाणून घ्या कारण