घरक्रीडानरेंद्र मोदी स्टेडियमला एक 'अदाणी एन्ड' तर दुसरा 'रिलायन्स एन्ड'

नरेंद्र मोदी स्टेडियमला एक ‘अदाणी एन्ड’ तर दुसरा ‘रिलायन्स एन्ड’

Subscribe

अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. या नव्या स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियम असं नाव देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमला दोन बॉलिंग एन्ड आहेत. एक अदानी एन्ड आणि दुसरं रिलायन्स एन्ड. यावरुन आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तथापि, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील मोदींना टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. मोदी सरकार हे हम दो हमारे दो यांचं सरकार असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा राहुल गांधींनी मोदींना टोला लगावला आहे. कारण अहमदाबादमधील ज्या मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियम नाव देण्यात आलं आहे, त्या स्टेडियमला दोन एन्ड आहेत. एक अदानी एन्ड आहे तर दुसरा रिलायन्स एन्ड आहे. हाच धागा पकडत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. “सत्य बाहेर आलं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमला दोन एन्ड आहेत, एक अदानी एन्ड तर दुसरं रिलायन्स एन्ड. आणि त्याचे अध्यक्ष जय शाह आहेत,” असं ट्विट राहुल गांधई यांनी केलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

Narendra Modi stadium Adani end and Reliance end Ahmedabad

May be an image of text that says "い 2 CO0 paytm paytm PINKBALEST TEST INDIA vs ENGLAND 3RD TEST TEST MATCH STAND LEVEL ADANI PAVILION PRICE FLOOR ADANI PREMIUM WEST, CENTER EAST 2,500 LOWER BLOCKD, RELIANCEE 1,000 LOWER BLOCKA&H 500 LOWER 450 LOWER BLOCKB,C,F&G BLOCKJ,K,L,M,P,Q,R BLOCK M,P,Q,R &RELIANCEN 400 UPPER 300 RELIANCE- 2 ဖ book bookmyshow show"

May be an image of text that says "RELIANCE 3 CORD AX BOX RELIANCE E F P 5 C 9 6 5 6 5 K 2 4 3 B 5 6 8 G A 5 H ADANI WEST PREMLM WESUM 32 PREMIUM PREMIUM ADANIM ADANI EAST ADANI PAVILION LEVEL Presidential Sults Floor Premlum Suits 5 Floor"

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -