घरक्रीडाMother's Day: ...आईविषयी बोलताना क्रिकेटर्स झाले भावूक!

Mother’s Day: …आईविषयी बोलताना क्रिकेटर्स झाले भावूक!

Subscribe

जगभरात दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला. सर्व कलाकार, क्रिकेटर्स, राजकीय नेत सर्वजण आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त करत सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत असतात. आज देखील अनेक जणांनी मदर्स डे निमित्ताने आईसोबतचे फोटो आणि काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यामुळे आज आपण क्रिकेटर्सने आपल्या आईविषयी काय लिहिलं आहे ते पाहूया….

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने ट्विटरवर त्याची आई रजनी तेंडुलकरसोबत एक फोटो शेअर केला आहे. सचिन तेंडुलकरने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘तुम्ही माझ्यासाठी आई आहेस. कारण सगळ्या गोष्टींच्या पलिकडे जात तू अप्रतिम आहेस. तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. तू माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.’

- Advertisement -

भारताची माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग मदर्स डेनिमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या आईविषयी काय म्हणाला ते ऐका…

- Advertisement -

 

 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला असून आईला मदर्स डेच्या शुभेच्या दिल्या आहेत.

भारताचा ऑलराउंडर क्रिकेटपटू युवराज आईविषयी असं ट्विट केलं आहे की, ‘जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि टॉयलेटच्या सीटऐवजी आईच्या कुशीत जाता तेव्हा तिला खूप चांगले वाटते. ती तुमच्यावर खूप प्रेम करते. आय लव्ह यू आई. माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि माझ्या शक्तीस्तंभ तू आहेस.’

भारताचा सलामीवीर शिखर धवनने व्हिडिओ शेअर करून आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघातला स्पिनर हरभजन सिंगने देखील आपल्या आईच्या फोटो शेअर करून ‘आई तू माझा देव आहेस’, असं लिहिलं आहे.

भारताचा फलंदाज के. एल. राहुने आपल्या आईसोबत लहानपणीचा फोटो शेअर केला करून मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – Photos – मराठी कलाकरांचा ‘Mummy’s Special’ दिवस!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -