घरक्रीडाधोनीच्या फार्म हाऊसमधील फळ-भाज्यांना मोठी डिमांड

धोनीच्या फार्म हाऊसमधील फळ-भाज्यांना मोठी डिमांड

Subscribe

मागणी वाढल्याने रांचीत सुरु केले नवे रिटेल आउटलेट

भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने क्रिकेट विश्वात आपली वेगळी छाप निर्माण केली. यानंतर धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेत शेती व्यवसायात मन रमवण्यास सुरुवात केली आहे. धोनीने आवडीसाठी सुरु केलेला व्यवसाय आता अधिक बहरु लागला आहे.धोनीच्या फार्म हाऊसमधील नैसर्गिक (ऑर्गेनिक) भाज्या आता बाजारात विकण्यासाठी देखील उपलब्ध झाल्या आहेत. त्याच्या शेतात पिकवलेल्या भाज्यांना आता मोठ्याप्रमाणात मागणी वाढली आहे.

ms cdhoni eeja farm open in ranchi
धोनीच्या फार्म हाऊसमधील नैसर्गिक (ऑर्गेनिक) भाज्या

त्यामुळे धोनीने रांचीमध्ये स्वत:चं भाज्या विकण्यासाठी रिटेल आउटलेट सुरु केले आहे. या आउटलेटमध्ये ग्राहकांची मोठ्याप्रमाणात गर्दी वाढत आहे. रांचीमध्ये इजा फार्मचं पहिले रिटेल आउटलेट उघडण्यात आले. रविवारी या आउटलेटचे उद्घाटन धोनीच्या जवळचा मित्र परमजित सिंग यांने केले. याविषयी सांगताना परमजित सिंह सांगतात, धोनी जी पण गोष्ट करण्याचे ठरवो ती मनापासून आणि बेस्ट करतो. त्याच्या या कामांचा लोकांना फायदा होणार आहे.

- Advertisement -
ms cdhoni eeja farm open in ranchi
रांचीमध्ये इजा फार्मचं पहिले रिटेल आउटलेट

या आउटलेटमध्ये ऑर्गेनिक भाज्या, फळ, डेअरी प्रॉडक्टही ठेवण्यात आले आहेत. यामुळे पुढील काही दिवसांमध्येच या आउटलेटमध्ये विविध प्रकारच्या भाजा नागरिकांना खरेदी करता येणार आहे. या आउटलेटमध्ये पहिल्याच दिवशी मटार, ओल, बीन्स, बटाटा, दूधी, शिमला मिर्ची, गवारसारख्या अनेक भाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आउटलेट सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली.

ms cdhoni eeja farm open in ranchi
या आउटलेटमध्ये ग्राहकांची मोठ्याप्रमाणात गर्दी वाढत आहे.

रांचीमध्ये धोनीचं ४३ एकर जागेवर मोठे फार्महाऊस आहे. याच फार्महाऊसमध्ये धोनी फळं, भाज्यांची शेती करतो. तसेच डेअरी प्रॉडक्टसाठी त्याने साहिवाल आणि फ्रीजन जातीच्या ३०० गायी देखील पाळल्या आहेत. या गायींपासून मिळणारे दूध गेल्या अनेक महिन्यांपासून रांची येथील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -