युवराजने महेंद्रसींग धोनी विषयी केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…

yuvraj singh
युवराज सिंग

भारतीय क्रिकेट संघातील सिक्सर किंग म्हणजे युवराज सिंग. नुकताच युवराज सिंगने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसींग धोणी विषयी एक वक्तव्य केलं आहे. युवराज त्याच्या १७ वर्षाच्या करिअरमध्ये अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला. यातील सर्वोत्तम कर्णधार कोण होता हे युवराजने सांगितले. त्याच बरोबर त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दल देखील एक वक्तव्य केले आहे.

नुकतीच युवराज सिंगने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत युवराजने हा खुलासा केला. युवराज म्हणाला, मला माझ्या करिअरमधील सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळलेले दिवस आठवतात. खरतर मी धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने जेव्हा २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा स्पर्धेतील शानदार कामगिरीमुळे मला मालिकावीर पुरस्कार देखील मिळाला होता. असे असले तरी मला सौरव गांगुली हा सर्वोत्तम कर्णधार वाटतो. कारण मी गांगुलीच्या नेतृत्वात खेळलो आहे आणि त्याने मला खूप आधार दिला. माझ्याकडे सौरवच्या कर्णधारपदाच्या आठवणी आहेत कारण त्याने मला साथ दिली. मला माही आणि विराटकडून तेवढी साथ मिळाली नाही”,

युवराजने वनडे कारकिर्दीत एकूण १४ शतके केली आहेत. युवीने ३०४ एकदिवसीय सामन्यात ८७०१ धावा केल्या. मुलाखतीत बोलताना युवराज पुढे म्हणाला, ‘मला मुरलीधरनविरुद्ध खूप संघर्ष करावा लागला. मला त्याची गोलंदाजी समजू शकली नाही. त्यानंतर सचिनने मला त्याच्या विरोधात स्वीप सुरू करण्यास सांगितले. सचिनच्या आयडीयामुळे मला मदत झाल्याचे युवी म्हणाला.