जब मिल बैठे दो यार…! एमएस धोनी आणि युवराजच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल…

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि फलंदाज युवराज सिंह (Yuvraj Singh) भरपूर दिवसानंतर ऐकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. हे दोन्ही क्रिकेटर्स मोठे स्टार्स आहेत. दोघांची गाठभेट ही जाहीरातीची शूट करताना झाली. दोन्ही लेजन्डस एक दुसऱ्यासोबत भरपूर खूश आहेत. टीम इंडियाच्या माजी क्रिकेटर्सच्या दरम्यान भरपूर दिवसानंतर दोघांच्या गाठभेट झाली. युवराज सिंह आयपीएल खेळत नाही आणि मैदानाता त्यांची भेट माहीसोबत होत नाही. एमएस धोनी आणि युवराज सिंह यांचे दुनियाभरात भरपूर चाहते आहेत. युवीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये वर्ल्ड कपचे जुने पार्टनरसोबत दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

क्रिकेटच्या मैदानात एमएस धोनी आणि युवराज सिंह या दोघांची फलंदाजी व पार्टनरशिप आपण विसरू शकत नाही. या दोघांनी मिळून टीम इंडियाला आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २००७ आणि वनडे वर्ल्ड कप २०११ वेळी चॅम्पियन बनवलं होतं. या शानदार जोडीनंतर आणि यश मिळाल्यानंतर माही व युवीच्या नात्यांत फूट पडली. युवीचे वडील योगराज सिंह माहीच्या नियतीवर प्रश्न उपस्थित करायचे आणि आपल्या मुलाचं आंतरराष्ट्रीय करिअर संपवलं. अशा प्रकारचे गंभीर आरोप युवीचे वडील माहीवर करत असत. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये फूट पडली होती. परंतु या व्हिडिओनंतर क्रिकेटच्या चाहत्यांना भरपूर आनंद झाला आहे.

एसएस धोनी आगामी काळात आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज कर्णधारपद स्वीकारणं आहे. तसच युवराज सिंह रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडियाला रिप्रेंझेंट करणार आहे. युवराज सिंह धोनीच्या नेतृत्वात १०४ एकदिवसीय सामन्यात ८८.२१ स्ट्राईक रेट नुसार ६ शकतं व २१ अर्धशतकांसोबत ३ हजार ७७ धावा झळकावल्या आहेत. २०११ च्या विश्वकप मध्ये युवी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट सुद्धा झाला होता. त्या टीमची कमान महेंन्द्र सिंग धोनीच्या हातात होती. या वर्षीच्या फ्रेंडशीप डेवर युवराजने टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत एक फोटो शेअर केला होता. परंतु त्यामध्ये धोनी नव्हता. या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, मौहम्मद कॅफ आणि टीम इंडियाचे इतर खेळाडू दिसत होते. परंतु त्यामध्ये धोनीचा फोटो नव्हता. दोघांच्या मित्रतावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.


हेही वाचा: ख्रिस गेलकडून टॉप ३ T-20 क्रिकेटर्सला पसंती, यूनिव्हर्स बॉसच्या यादीत भारतीय खेळाडूचा समावेश