माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या धोनी हा आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळतो. धोनीचे जगभरात फॅन्स आहेत.धोनी हा अमेरिकेत कुटुंबासोबत सुट्टी इंजॉय करण्यासाठी गेला आहे. यावेळी धोनींचा फॅनसोबत एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनीने त्यांच्या फॅनकडून चॉकलेटचा डबा परत मागितला आहे.
या व्हिडीओमध्ये धोनीने गोल्फ खेळून बाहेर येत असताना त्यांच्या एका फॅनने त्याचा ऑटोग्राफची मागणी केली. त्यावेळी धोनींच्या हातात चॉकलेटचा एक डबा होतो. तो धोनीने त्यांच्या फॅन्सकडे दिला होता. यानंतर धोनीने फॅन्सला ऑटोग्राफ दिल्यानंतर त्यांनी त्याच्या चॉकलेटचा डबा परत मागितला. त्यावेळी फॉन देखील हसत मुखाने धोनींचा चॉकलेटचा डबा परत केला.
हेही वाचा – India VS Pakistan : काही वेळातच सुरू होणार हायव्होल्टेज ड्रामा; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष
धोनींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. धोनींच्या व्हिडीओवर त्यांचे फॅन्स वेगवेगळ्या रिएक्शन देत आहेत. धोनींचे फॅन्स म्हणतात की, धोनी त्यांच्या वस्तू परत मागताना अजिबात लाजत नाही. मग तो चॉकलेटा डबा असो की आयपीएलची ट्रॉफी, असे काही फॅन्सने रिएक्शन दिल्या आहेत. एका फॅन्सने लिहिले की, धोनी नेहमी अलर्ट राहतो. तर दुसऱ्यांनी म्हटले की, धोनीला हा चॉकलेटचा डबा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून मिळला आहे.