घरक्रीडाऑस्ट्रेलियाच्या वनडे, कसोटी कर्णधारपदी धोनी-कोहलीची निवड

ऑस्ट्रेलियाच्या वनडे, कसोटी कर्णधारपदी धोनी-कोहलीची निवड

Subscribe

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने भारतीय खेळाडूंना आगळावेगळा सन्मान दिला आहे. ऑस्ट्रेलियाने सोमवारी २०१० ते २०१९ या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. सर्वोत्तम वन-डे संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे तर कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आलेले आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही संघात भारताच्या तीन खेळांडूना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. धोनीने २०११ साली भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक कसोटी सामने जिंकले आहेत, तसेच फलंदाज म्हणून त्याने वैयक्तिक खेळ देखील चांगला केलेला आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने देखील वन-डे संघात स्थान मिळवले आहे.

पत्रकार मार्टिन स्मिथ यांनी वन-डे संघाची निवड केलेली आहे. धोनीच्या कर्णधारपदाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, धोनीने एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुवर्ण काळ पाहीला. धोनीने आपल्या नेतृत्व आणि फिनिशर म्हणून भारताला २०११ मध्ये वर्ल्डकप मिळवून दिला होता. त्याची ही खेळी दशकातील सर्वोत्तम असल्याचे स्मिथ सांगतात. तसेच विराट कोहली हा एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम फलदांज असल्याचेही स्मिथ यांनी अधोरेखित केले. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही संघात स्थान मिळवले आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय (One Day) संघ –

महेंद्रसिंह धोनी – कर्णधार-यष्टीरक्षक, रोहित शर्मा, हाशिम अमला, विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, जॉस बटलर, राशिद खान, शाकिप अल हसन, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट आणि लसिथ मलिंगा

ऑस्ट्रेलियाचा दशकातील सर्वोत्तम कसोटी (Test) संघ –

विराट कोहली – कर्णधार, अॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, स्टिव्ह स्मिथ, एबी डिव्हीलियर्स (यष्टीरक्षक) बेन स्टोक्स, डेल स्टेन, नॅथन लॉयन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -