MS Dhoni Gifts : पाकिस्तानी क्रिकेटपटूला धोनीने दिलं मोठं गिफ्ट, शेअर केली भावनिक पोस्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरीस रौफला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त जरी झाली असला तरी सुद्धा तो अनेक चाहत्यांचे मनं जिंकून घेतो. माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टनकूल माहीने CSK ची जर्सी पाकिस्तानचा खेळाडू हॅरीस रौफला भेट म्हणून दिली आहे. २८ वर्षीय हॅरीस रौफने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या जर्सीचे फोटो पोस्ट केले आहेत. दयाळू स्वभावाचा धोनी असून तो त्यांच्या कृतीने सर्वांची मनं जिंकतो अशा प्रकारची भावनिक पोस्ट रौफने केली आहे.

ही टी-शर्टची सुंदर भेट देऊन लिजिंड आणि धोनीने मला सन्मानित केलंय. ७ अजूनही दयाळू स्वभाव आणि सदभावनेच्या कृतीने लोकांची मनं जिंकत आहे. पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद, असं देखील रौफने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलंय.

विकेट घेणाऱ्यामध्ये हॅरीस दुसऱ्या स्थानावर

हॅरीस रौफ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून तो बिग बॅश लिगमध्ये स्टार्ससाठी खेळत आहे. यूएईमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघाला उपांत्यफेरीपर्यंत पोहोचवण्यात रौफची महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच सर्वाधिक विकेट घेणाऱ्यामध्ये तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

दरम्यान, धोनी सुद्धा या टी-२० वर्ल्डकपमध्ये संघाच्या मार्गदर्शनासाठी भूमिकेमध्ये होता. परंतु पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरूद्ध पराभव झाल्यानंतर सुपर १२ मध्येच भारताचा प्रवास संपला आहे. माहीने २०२१ च्या आयपीएलमध्ये चौथ्या वेळेस संघाला विजेतेपद जिंकवून दिलं आहे.

चेन्नई संघासाठी धोनीला पुन्हा एकदा रिटेन करण्यात येणार आहे. धोनी आता मेगा ऑक्शन आणि आयपीएल २०२२ ची तयारी करत आहे. त्याचसोबतच हॅरीस रौफ पुढच्या पाकिस्तान सुपर लीगच्या तयारीला लागला आहे. २७ जानेवारीपासून पीएसएलच्या हंगामाला सुरूवात होणार आहे.


हेही वाचा : T20 Playing Conditions : षटकांची गती कमी झाल्यास बसणार दंड, टी२० सामन्यातील नियमांमध्ये मोठे बदल