घरक्रीडापवारांची राजकारणातून तर धोनीची IPL मधून निवृत्ती? माहीने स्पष्टचं सांगितलं...

पवारांची राजकारणातून तर धोनीची IPL मधून निवृत्ती? माहीने स्पष्टचं सांगितलं…

Subscribe

राजकारणात आणि क्रीडा क्षेत्रात काहीही होऊ शकतं. जशी राजकारणात गुगली टाकता येते तशी क्रीडा क्षेत्रात चांगली बॅटींगही करता येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर धोनीही आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. माही पुढच्या हंगामातील स्पर्धेत खेळणार नाही, असं चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे. परंतु या चर्चेवर नाणेफेकीदरम्यान माहीनं मौन सोडलं आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. परंतु सामना सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. नाणेफेकीदरम्यान न्यूझीलंडचे समालोचक डॅनी मॉरिसनला त्याच्या निवृत्तीबद्दल विचारले असता धोनी म्हणाला की, हे माझे शेवटचे आयपीएल आहे की नाही, हे तुम्हीच ठरवले आहे. मी अजून याबाबत काहीच बोललेलो नाहीये, असं महेंद्रसिंग धोनी म्हणाला. धोनीच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनी पुढील हंगामात दिसू शकतो, अशी चाहत्यांमध्ये आशा आहे.

- Advertisement -

धोनीने लखनऊविरुद्ध नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला मैदान, खेळपट्टी आणि परिस्थिती पाहावी लागेल. दीपक चहर तंदुरुस्त असून आकाश सिंगच्या जागी संघात सामील झाल्याची माहितीही चेन्नईच्या कर्णधाराने दिली.

- Advertisement -

धोनीने निवृत्तीबाबत वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर त्याने २१ एप्रिलला सांगितले होते की, हा त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे. तसेच त्याला त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याचा आनंद घ्यायचा आहे. सध्या सुरू असलेल्या हंगामात धोनी निवृत्ती घेणार अशी अटकळ बांधली जात होती. परंतु त्या शक्यतेला धोनीने आज पूर्णविराम दिला आहे.


हेही वाचा : आधी IPL, आता के.एल. राहुल WTCच्या भारतीय संघातूनही बाहेर होण्याची शक्यता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -