Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर IPL 2020 IPL : धोनी पुन्हा आयपीएल खेळणार का? त्यालाच ठाऊक - किरण मोरे

IPL : धोनी पुन्हा आयपीएल खेळणार का? त्यालाच ठाऊक – किरण मोरे

धोनीने ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.   

Related Story

- Advertisement -

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळला नव्हता. दरम्यान त्याने ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याने धोनी पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार नाही अशी भीती चाहत्यांना वाटू लागली होती. मात्र, युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत धोनीचे मैदानात पुनरागमन झाले. परंतु, त्याला आणि त्याच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगला खेळ करता न आल्याने धोनीच्या निवृत्तीबाबतची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, आयपीएल स्पर्धेत खेळत राहायचे का? याबाबतचा निर्णय केवळ धोनीच घेऊ शकतो, असे भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांना वाटते.

धोनीने आयपीएल स्पर्धेतूनही निवृत्त व्हायचे की खेळत राहायचे? याचा निर्णय धोनी स्वतःच घेऊ शकतो. तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या किती फिट आहे, हे त्यालाच ठाऊक आहे. त्याचे शरीर त्याला पुन्हा पुढील वर्षी आयपीएल स्पर्धा खेळण्याची परवानगी देणार का? याचे उत्तर इतर लोक नाही, तर धोनीच देऊ शकतो, असे किरण मोरे एका मुलाखतीत म्हणाले.

- Advertisement -

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईला यंदा पहिल्यांदा आयपीएलच्या इतिहासात प्ले-ऑफ गाठण्यात अपयश आले. याबाबत मोरे यांनी सांगितले, १३ वर्षांमध्ये एखाद्या मोसमात चांगली कामगिरी करता न येणे अपेक्षितच आहे. चेन्नईने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे त्यांना एका मोसमात चांगला खेळ करण्यात अपयश आल्याची फार चर्चा करण्याची गरज नाही. धोनी महान खेळाडू आहे. तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणे सोपे नाही. यंदा त्यांना चांगला खेळ करता आला नाही. आता यामागे काय कारणे होती, हे ते शोधतील आणि पुढील मोसमात पुन्हा दमदार कामगिरी करताना दिसतील.

- Advertisement -