घरक्रीडाVideo : 'MS Dhoni is back, चेन्नई सुपर किंगने शेअर केला व्हिडिओ!

Video : ‘MS Dhoni is back, चेन्नई सुपर किंगने शेअर केला व्हिडिओ!

Subscribe

धोनीला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळावं अशी त्याच्या चाहत्यांची प्रचंड इच्छा आहे.  अशी मागणी सोशल मीडियामधून होत होती.  अशा परिस्थितीत IPL मध्ये आपली चमक दाखवून धोनी संघात पुनरागमन करेल, असा चाहत्यांना विश्वास होता, पण दुर्दैवाने IPL स्पर्धा कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. त्याचप्रमाणे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. आयपीएलला स्थगिती मिळाल्यामुळे क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची क्रिकेट मैदानावरची एन्ट्री थांबली आहे.

- Advertisement -

पण सध्या लॉकडाऊनमध्ये धोनी काय करत असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे क्रिकेटर आपल्या परिवारांसोबत वेळ घालवत आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत जोडले गेले आहेत. महेंद्र सिंह धोनी हा सोशल मीडियावर कमी ऍक्टिव्ह असतो. मात्र, त्याची पत्नी साक्षी धोनी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. साक्षी आपले घर, धोनी आणि मुलगी जीवाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तेव्हा आता लॉकडाउनच्या काळात साक्षीने धोनीचा एक फोटो शेअर केला असून लॉकडाऊनमध्ये धोनी काय करत आहे, हे तिने सांगितले आहे.

महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी हिने एक झकास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता CSK ने एक झकास व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी आपली मुलगी झिवा आणि कुत्रा यांच्यासोबत चेंडूने खेळताना दिसतो आहे. या व्हिडीओच्या कॅप्शमध्ये धोनी इज बॅक असं लिहिण्यात आलं आहे.

- Advertisement -

या आधी देखील साक्षीने धोनीचा लॉकडाऊन टाईमचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.


हे ही वाचा- महेंद्र सिंह धोनी गार्डनमधील गवत कापतोय; साक्षीने सोशल मीडियावर शेअर केला फोटो!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -