Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाMS Dhoni Last Match : MS धोनी निवृत्तीची घोषणा करणार, शेवटचा सामना कधी?

MS Dhoni Last Match : MS धोनी निवृत्तीची घोषणा करणार, शेवटचा सामना कधी?

Subscribe

एकिकडे आयपीएल सुरू होत असल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाचा आणि चेन्नई सूपर किंग्ज संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

MS Dhoni IPL 2025 मुंबई : आयपीएल सुरू होताच सर्व क्रिकेट प्रेमींसाठी आनदांचा क्षण असतो. कारण दररोज संध्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांमुळे मनोरंजन होतं. याशिवाय चौकार आणि षटकारांचा पाऊस आणि विविध विक्रम पाहायला मिळतात. यंदाही आयपीएलमध्ये एक ना अनेक नवे खेळाडू सामिल झाले आहेत. तसेच, स्टार खेळाडूही आहेत. त्यामुळे हे सर्व खेळाडू कशाप्रकारे खेळी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु, एकिकडे आयपीएल सुरू होत असल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाचा आणि चेन्नई सूपर किंग्ज संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे आयपीएल 2025च्या अखेरच्या सामन्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करणार असेही बोललं जात आहे. (MS Dhoni Last Match IPL 2025 Chennai Super Kings Schedule)

इंडियन प्रीमियर लीग 2025 (आयपीएल) चं यंदा 18वं पर्व आहे. आयपीएलचे 18वं पर्व 22 मार्च 2025पासून सुरू होणार आहे. आयपीएल 2025 चा पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. बीसीसीआयने रविवारी (16 फेब्रुवारी) आयपीएलच्या 18व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या पर्वातील सामने एकूण 13 ठिकाणी होणार असून, 74 लढतींचा थरार पाहायला मिळणार आहे. यंदाचा अंतिम सामनाही इडन गार्डन्स स्टेडियमवरच होणार आहे.

आयपीएल 2025च्या वेळापत्रकानुसार तिसरा सामना महत्त्वाचा मानला जात आहे. कारण तिसऱ्या सामन्यातील लढत ही मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सूपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. हा सामना रविवार, 23 मार्च रोजी होणार आहे. ही लढत महत्त्वाची मानली जात आहे, कारण या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. एमएस धोनी देखील चेन्नईकडून खेळणार आहे, परंतु ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

आयपीएलच्या लीग टप्प्यातील चेन्नईचे सात सामने घरच्या मैदानावर आणि उर्वरित सात सामने प्रतिस्पर्ध्याच्या घरच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. दरम्यान, चेन्नईचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना 18 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध असेल. जो महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा सामना असेल, असं म्हटलं जात आहे.

IPL 2025 मधील चेन्नई सुपर किंग्जचं संपूर्ण वेळापत्रक

23 मार्च – चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियंस (CSK vs MI)
28 मार्च – चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (CSK vs RCB)
30 मार्च – चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)
5 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC)
8 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स (CSK vs PBKS)
11 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स (CSK vs KKR)
14 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs लखनौ सुपर जायंट्स (CSK vs LSG)
20 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियंस (CSK vs MI)
25 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs सनराइजर्स हैदराबाद (CSK vs SRH)
30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स (CSK vs PBKS)
3 मे – चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (CSK vs RCB)
7 मे – चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स (CSK vs KKR)
12 मे – चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)
18 मे – चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटन्स (CSK vs GT)


हेही वाचा – IPL 2025 Schedule : मुंबईचा पहिला सामना चेन्नईसोबत, वानखेडेवर किती? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक