घरक्रीडाDhoni Quit CSK Captaincy : एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडलं,...

Dhoni Quit CSK Captaincy : एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडलं, या खेळाडूकडे दिली जबाबदारी

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कुल म्हणून प्रसिद्ध असलेला अष्टपैलू खेळाडू महेंद्रसिंह धोनीने आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडलं आहे. त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाज रविंद्र जडेजाला चेन्नईच्या संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. जडेजाला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरुन माहिती दिली आहे. धोनीने कर्णधारपद सोडलं असलं तरी तो संघात खेळाडू म्हणून कायम राहणार आहे.

आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी जडेजा चेन्नईकडून रिटेन करण्यात आलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. जडेजाला चेन्नईने १६ करोड रुपयांना खरेदी केले आहे. एमएस धोनीला संघाने १२ करोड रुपयांना खरेदी केले होते.

- Advertisement -

रविंद्र जडेजा आगामी हंगामात सीएसकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करताना दिसणार आहे. सीएसकेने गुरुवारी असे म्हटलं आहे की, महेंद्रसिंह धोनी सीएसकेची कमान संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. जडेजा २०१२ पासून संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. रविंद्र जडेजा चेन्नईचे नेतृत्व करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -