घरक्रीडाMS Dhoni-Ravindra Jadeja IPL 2022 : जाडेजाने कर्णधारपद सोडलं, धोनी पुन्हा चेन्नईचा...

MS Dhoni-Ravindra Jadeja IPL 2022 : जाडेजाने कर्णधारपद सोडलं, धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार

Subscribe

महेंद्र सिंग धोनीकडे पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. रवींद्र जाडेजाने खराब कामगिरीनंतर स्पर्धेच्या मध्यातच चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. आठ सामन्यात सहा पराभव पत्करल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी याची घोषणा केली. जाडेजाला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे होते. यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

चेन्नईने दिलेल्या माहितीनुसार रवींद्र जाडेजाने अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि एमएस धोनीला चेन्नईचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. एमएस धोनीने चेन्नईची ही विनंती मान्य केली आहे. धोनीने आयपीएलचा १५ वा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला ही जबाबदारी देण्यात आली. जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला ८ पैकी ६ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई सध्याच्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

- Advertisement -

चेन्नईचा या मोसमातील नववा सामना रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईच्या खराब फॉर्म व्यतिरिक्त, जाडेजाने स्पर्धेत देखील संघर्ष केला आहे, त्याने १२१.७ च्या स्ट्राइक रेटने ९२ चेंडूत फक्त ११२ धावा केल्या, तर ८.१९ च्या इकॉनॉमी रेटने आठ डावात पाच बळी घेतले आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -