नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रविवारी (31 मार्च) क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम केला आहे, ज्याला आतापर्यंत जगातील कोणताही यष्टिरक्षक स्पर्श करू शकला नाही. धोनीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या मोसमात हा ऐतिहासिक विक्रम केला आहे. (MS Dhoni Record T-20 Mahendra Singh Dhoni Creates History The first wicketkeeper to record 300 wickets behind the wicket in T20 cricket)
रविवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या चेंडूवर धोनीने पृथ्वी शॉला विकेटच्या मागे झेलबाद केले.
कार्तिककडेही कामरानला पराभूत करण्याची संधी
टी-20 क्रिकेटमध्ये यष्टीचा मागे 300 जणांचा विकेट घेणारा धोनी जगातील पहिला यष्टिरक्षक बनला आहे. या यादीत पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल आणि भारताचा दिनेश कार्तिक संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी 274 विकेट्स घेतल्या आहेत.
कार्तिक अजूनही आयपीएल खेळत आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळत आहे. अशा स्थितीत कामरानला पराभूत करण्याची संधी त्याच्याकडे आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक (270) आणि इंग्लंडचा जोस बटलर (209) तिसऱ्या स्थानावर आहे. तो सध्या क्रिकेटही खेळतोय.
टी-20 क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी
300 – महेंद्रसिंग धोनी
274 – कामरान अकमल
274 – दिनेश कार्तिक
270 – क्विंटन डीकॉक
209 – जोस बटलर
धोनीच्या कर्णधारपदाचा विक्रम
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 332 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले (कसोटी + ODI + T20). जे कर्णधार म्हणून सर्वोच्च आहे. रिकी पाँटिंगने 324 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.
या 332 सामन्यांपैकी धोनीने 178 सामने जिंकले आणि 120 सामने गमावले. 6 सामने बरोबरीत तर 15 अनिर्णित राहिले. माहीने 90 कसोटींमध्ये 4876 धावा, 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10773 धावा आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1617 धावा केल्या आहेत. त्याने 250 IPL सामन्यात 5082 धावा केल्या आहेत.
(हेही वाचा: Shirur Lok Sabha Constituency : अढळरावांच्या प्रचारात दिलीप वळसेंची साथ नाही; दुखापतग्रस्त हाताचं कारण)