घरक्रीडाMS Dhoni retirement: जेतेपदानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा, माहीसह कपिल देवनंही मांडलं मत

MS Dhoni retirement: जेतेपदानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा, माहीसह कपिल देवनंही मांडलं मत

Subscribe

आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामातील अखेरचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK Vs GT) यांच्यात पार पडला. यावेळी चेन्नईने गुजरातचा पराभव करत पाचव्यांदा ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं. या सामन्याला २८ मे रोजी सुरूवात होणार होती. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे काल(सोमवार) यांच्यात अखेरचा आणि अंतिम सामना पार पाडला. परंतु जेतेपद मिळवल्यानंतर आता चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni retirement) यांच्या निवृत्तीची जोरदार चर्चा रंगत आहे. अगदी चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांनीही यावर आपलं मत मांडलं आहे.

धोनीच्या निवृत्तीची का होतेय चर्चा?

पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी धोनीला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. त्यानंतर धोनी म्हणाला की, जर परिस्थिती पाहिली तर ही योग्य वेळ आहे की, मी निवृत्ती घ्यावी. माझ्यासाठी हे बोलणे खूप सोपे आहे. पण पुढील नऊ महिन्यांमध्ये कठोर परिश्रम करून मेहनत घेणे आणि पुन्हा एक हंगाम खेळणं हे फार कठीण आहे. कारण मला माझ्या शरीराने साथ दिली पाहीजे.

- Advertisement -

चेन्नईच्या चाहत्यांनी जे प्रेम मला दिले आहे. आता वेळ आली आहे की, मी त्यांना काही तरी दिलं पाहिजे. मात्र, एक अजून हंगाम त्यांच्यासाठी खेळण्याचं गिफ्ट माझ्याकडून त्यांना असेल. त्यांनी जे प्रेम आणि उत्साह दाखवला आहे, आता मला देखील त्यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे. लोकांना मी आवडतो आणि ते माझ्यावर प्रेम करतात. कारण मी जसा आहे तसा त्यांना आवडतो आणि मला स्वत:ला बदलायचे नाहीये. हा माझ्या करिअरचा अखेरचा टप्पा आहे, असं महेंद्रसिंग धोनी म्हणाला.

- Advertisement -

कपिल देवनंही मांडलं मत

धोनीच्या निवृत्तीची चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. ही चर्चा करण्यापेक्षा धोनीने १५ वर्ष दिलेल्या सेवेबद्दल चाहत्यांनी त्याचे आभार मानायला हवेत. त्यामुळे फायनलनंतर त्याने निवृत्ती जाहीर केली, तर ती चाहत्यांनी स्वीकारायला हवी. तो १५ वर्षांपासून आयपीएल खेळतोय. आपण फक्त धोनीबद्दलच का बोलत आहोत? त्याने त्याचे काम केले आहे. त्याने आयुष्यभर खेळावे असे आपल्याला वाटते का? तसे होणार नाही. त्याऐवजी तो १५ वर्षे खेळला याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत, असं मत भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव यांनी माडलं आहे.

हेही वाचा : CSK vs GT, IPL 2023 : शेवटच्या २ चेंडूत जडेजाने चालवली तलवार, गुजरातला चारली धूळ

यापूर्वी देखील मुलाखतीच्या माध्यमातून हर्षा भोगले यांनी धोनीला अनेक प्रश्न विचारले. ज्यामध्ये निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी धोनीने या प्रश्नांची उत्तरे देताना आपले इरादे गुलदस्त्यातच ठेवले होते. दरम्यान, यानंतर धोनीचा २०१९ चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. यात देखील हर्षा भोगलेच धोनीला एक प्रश्न विचारतात. आयपीएलने हा व्हिडिओ 24 एप्रिल 2019 ला पोस्ट केला होता.

या व्हिडिओत हर्षा भोगले विचारतात की, चेन्नई संघाची खास गोष्ट काय आहे. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवता? ही गोष्ट जवळपास नक्की असते की तुम्ही लोकं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करणारच. यावर धोनीने अत्यंत खुबीने उत्तर दिले. धोनी म्हणाला की, जर मी हे सर्वांना सांगितले तर मला लिलावात कोणी खरेदी करणार नाही. त्यामुळे तुम्ही याला माझे ट्रेड सिक्रेट म्हणून शकता.


हेही वाचा : MS Dhoni : निवृत्तीच्या प्रश्नावरील धोनीचे उत्तर गुलदस्त्यात; म्हणाला, ‘तर मला…’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -