घरक्रीडानिवृत्तीमुळे भारतीय निराश; पंतप्रधान मोदींचं धोनीला भावनिक पत्र

निवृत्तीमुळे भारतीय निराश; पंतप्रधान मोदींचं धोनीला भावनिक पत्र

Subscribe

भारताचा यशस्वी कर्णधार महेद्रसिंह धोनीने स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धोनीला पत्र लिहून त्याचे कौतुक केले आहे. धोनी तू नवीन भारताचा चेहरा आहेस. जिथे तरुणांचे नशिब त्यांच्या कुटुंबाचे नाव ठरवत नाही, परंतु स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंह धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पंतप्रधान मोदींनी पाठवलेल्या पत्राबद्दल आभार मानले आहेत. “कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना केवळ कौतुकाची अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाचे आणि बलिदानाची नोंद घेतली जावी आणि त्यांचे सर्वांनी कौतुक करावे असं त्यांना वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद,” असे धोनीने म्हटले आहे. धोनीने पंतप्रधानांनी पाठवलेलं पत्र ट्विट केले आहे.

- Advertisement -

मोदींनी पत्रात काय म्हटले आहे?

“१५ ऑगस्ट रोजी तू तुझ्या ट्रेडमार्क स्टाइलमध्ये म्हणजेच अनपेक्षितपणे एक लहान व्हिडीओ शेअर केलास आणि त्यानंतर देशभरामध्ये चर्चा सुरु झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले मात्र त्याचवेळी ते तुझे आभारीही आहेत. मागील दीड दशकामधील तुझ्या भारतीय क्रिकेटसाठीच्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत,” असं मोदींनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

“तुझ्या क्रिकेट कारकिर्दीकडे आकडेवारीच्या नजरेने पाहता येईल. तू सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहेस. भारताला अग्रेसर बनवण्यामध्ये तुझे योगदान मोलाचे आहे. इतिहासामध्ये तुझे नाव सर्वोत्तम फलंदाज, कर्णधार आणि या खेळातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून नोंदवले जाईल. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना सर्व सामान्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. तो पुढील अनेक पिढ्यांना लक्षात राहील. महेंद्रसिंह धोनी हे नाव केवळ खेळातील आकडेवारी आणि सामना जिंकण्याच्या शैलीसाठी लक्षात राहणार नाही. तुझ्याकडे केवळ खेळाडू म्हणून पाहणे चुकीचे ठरणारे आहे. तुझे योगदान हे आश्चर्यचकित करणारे आहे,” असं मोदींनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -