घरक्रीडाMS Dhoni च्या आयुष्यातला हा योगायोग कायम चाहत्यांना टोचत राहील!

MS Dhoni च्या आयुष्यातला हा योगायोग कायम चाहत्यांना टोचत राहील!

Subscribe

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती स्वीकारली आणि त्याच्या लाखो चाहत्यांचा कूल हरपला. माहीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. मात्र, त्याच्या चाहत्यांनी ट्वीटरवर त्याला सेंडऑफ देणाऱ्या मेसेजेसचा अक्षरश: पाऊस पाडला. पण या सगळ्यांमध्ये एक मेसेज मात्र भलताच व्हायरल होऊ लागला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या कारकिर्दीची सुरुवात आणि त्याच्या कारकिर्दीचा शेवट एकाच प्रकारे आऊट होऊन झाल्याची बाब एका चाहत्याने फोटोसहित अधोरेखित केली आणि हा फोटो व्हायरल होऊ लागला. त्यामुळे ज्याचं सगळंच स्पेशल ठरलं, त्या माहीची निवृत्ती देखील या स्पेशल टचनेच झाली. ही बाब त्याला आणि त्याच्या चाहत्यांना देखील कायम लक्षात राहणारी आहे.

नक्की काय आहे हा स्पेशल योगायोग?

२३ डिसेंबर २०१४ साली महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पदार्पण केलं होतं. बांगलादेश विरूद्धच्या मालिकेमध्ये धोनीला अंतिम ११ सदस्यांच्या संघामध्ये स्थान देण्यात आलं होतं. कर्णधार होता भारताची दादागिरी जगाला दाखवणारा स्टायलिश कॅप्टन सौरव गांगुली. चितगावमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये धोनी खेळायला आला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांना, त्याच्या मित्रमंडळींना त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. तोपर्यंत त्याचा असा क्रिकेट चाहता वर्ग तयार झाला नसला, तरी भारतीय क्रिकेटचे चाहते महेंद्र सिंह धोनीने उत्तम खेळावं अशी अपेक्षा ठेवत होते. पण एकही रन न करता माही त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला. सुरुवात सिंगल रन काढून करण्याच्या विचारात असलेला माही रन आऊट झाला.

- Advertisement -

MS Dhoni Run Out

२०१९ वर्ल्डकपचा ‘तो’ क्षण!

२०१९च्या ICC World Cup मध्ये कॅप्टन कूल त्याचा शेवटचा सामना खेळला. न्यूझीलंडविरूद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताची बॅटिंग आणि वर्ल्डकपच्या आशा गटांगळ्या खात असताना माही क्रीझवर तंबू ठोकून उभा होता. त्याच्याच खांद्यावर तमाम भारतीयांच्या वर्ल्डकपच्या आशा जिवंत होत्या. पण याचवेळी संघाला त्याची गरज असताना आणि नेहमीप्रमाणे संघाला ज्याची गरज आहे तीच बाब करताना म्हणजेच स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात मार्टिन गप्टिलच्या अचूक थ्रोवर माही रनआऊट झाला. धोनी बाद झाला आणि न्यूझीलंडने जणू सामना जिंकल्याचा जल्लोष केला. कारण ‘महेंद्र सिंह धोनी’ बाद झाला होता!

- Advertisement -

MS Dhoni Run Out

महेंद्र सिंह धोनीचा तो शेवटचा सामना ठरला. वर्ल्डकपनंतर धोनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना दिसला नाही. त्यामुळे धोनीच्या कारकिर्दीची सुरुवात देखील रनआऊटने झाली होती आणि त्याच्या कारकिर्दीचा शेवट देखील रनआऊटनेच झाल्याचा अजब योगायोग घडल्याची प्रतिक्रिया त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.


हेही वाचा – MS Dhoni पाठोपाठ Suresh Raina चीही निवृत्तीची घोषणा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -