घरक्रीडातिशी पार तरीही चेन्नईची विजयी धार

तिशी पार तरीही चेन्नईची विजयी धार

Subscribe

तरुणांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी २० क्रिकेटमध्ये, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने कमाल केली. स्वत: ३७ वर्षांचा असलेला धोनी आणि निम्म्यापेक्षा जास्त तिशी पार केलेल्या सीएसकेच्या खेळाडूंनी आयपीएलचे जेतेपद पटकावले.
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. चेन्नईने याआधी २०१० आणि २०११ साली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने ५७ चेंडूंत आठ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११७ धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. १६ धावा करणाऱ्या अंबाती रायडूने विजयी चौकार ठोकला

चेन्नईच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे, धोनीच्या संघातील ८ खेळाडूंचे वय हे जवळपास ३० पेक्षा जास्त आहे. स्वत: धोनी ३६ वर्ष ११ महिन्यांचा म्हणजेच ३७ वर्षांचा आहे. तर फायनलमध्ये धडाकेबाज नाबाद शतक ठोकणारा शेन वॉटसनही धोनीच्याच वयाचा आहे. धोनी आणि वॉटसन ३६ वर्ष ११ महिन्यांचे आहेत. याशिवाय ड्वेन ब्राव्हो ३४ वर्ष, ड्युप्लेसी ३३ वर्ष, अंबाती रायडू ३२ वर्ष, सुरेश रैना ३१ वर्ष, कर्ण शर्मा ३० वर्ष, रवींद्र जाडेजा २९ वर्ष सहा महिने म्हणजेच जवळपास ३० वर्ष, असे चेन्नईचे जवळपास ८ खेळाडू ३० किंवा ३० पेक्षा जास्त वयाचे आहेत.

- Advertisement -

वय नाही, फिटनेस महत्त्वाचा- धोनी
सामना संपल्यानंतर धोनीला खेळाडूंच्या वयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धोनीने वय नव्हे तर फिटनेस महत्त्वाचा असल्याचे सांगितले. धोनी म्हणाला, आपण बऱ्याचदा वयाबद्दल बोलतो. मात्र वय नव्हे तर फिटनेस महत्त्वाचा आहे. रायडू ३३ वर्षांचा आहे, मात्र ते महत्त्वाचे नाही. कोणताही कर्णधार चपळ खेळाडू निवडतो, त्यावेळी तो १९-२० वर्षांचा आहे का हे पाहात नाही. त्यामुळे वय हे फक्त एक आकडा आहे.

चेन्नईला २० कोटी, हैदराबादला १२.५० कोटी
धोनीच्या चेन्नई ब्रिगेडला विजेतेपदाबद्दल तब्बल वीस कोटींची बक्षीसपात्र रक्कम देण्यात आली आहे. तर उपविजेत्या हैदराबादच्या संघाला १२ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर लावल्या जाणाऱ्या बोलीसोबतच आता विजेतेपदाची ही रक्कमही अनेकांनाच थक्क करून जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -