घरक्रीडाVideo : धोनीने सलग तीन चेंडूत लगावले तीन षटकार

Video : धोनीने सलग तीन चेंडूत लगावले तीन षटकार

Subscribe

चेन्नईला आज राजस्थानकडून पराऊत व्हावं लागलं मात्र, सर्व क्रिकेट रसिकांना जूना धोनी पाहायला मिळाला. धोनीने अंतिम षटकांत टॉम करनच्या गोलंदाजीवर सलग तीन चेंडूत तीन षटकार खेचले. एक षटकार तर मौदानाच्या बाहेर रस्त्याच्या पलिकडे मारला. गंमत म्हणजे रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या व्यक्तीने हा चेंडू घरी नेला. धोनीने आज सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत १७ चेंडूत २९ धावा केल्या.

- Advertisement -

 

- Advertisement -

दरम्यान, आज संजू सॅमसनची झुंजार फलंदाजी आणि त्याला मिळालेली स्टिव्ह स्मिथची साथ यामुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला १६ धावांनी पराभूत करत आयपीएलच्या १३ व्या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. शारजाह मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चेन्नईच्या अंगलट आला. संजू सॅमसनने षटकारांचा पाऊस पाडत धोनीचा निर्णय सिद्ध चूकिचा ठरवला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -