घरक्रीडामुंबई चॅम्पियनशिप टी-२० लीग : जे व्ही स्पोर्ट्स क्लबचा पराभव करत ऍग्रीबीड...

मुंबई चॅम्पियनशिप टी-२० लीग : जे व्ही स्पोर्ट्स क्लबचा पराभव करत ऍग्रीबीड क्रिकेट क्लबचा विजय

Subscribe

ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने जे व्ही स्पोर्ट्स क्लबचा २६ धावांनी पराभव करत मुंबई चॅम्पियनशिप टी - २० लीग क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. कोकण युवा प्रतिष्ठानाने मुंबई चॅम्पियनशिप टी - २० लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.

मुंबई : ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने जे व्ही स्पोर्ट्स क्लबचा २६ धावांनी पराभव करत मुंबई चॅम्पियनशिप टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. कोकण युवा प्रतिष्ठानाने मुंबई चॅम्पियनशिप टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुंबई चॅम्पियनशिप टी-२० लीग क्रिकेट स्पर्धे ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने दिलेल्या ९ बाद १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जे व्ही स्पोर्ट्स क्लबला २० षटकात ७ बाद १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.

ऍग्रीबीड क्रिकेट क्लब आणि जे व्ही स्पोर्ट्स क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात प्रतीक घरत (३९), अख्तर शेख (३०), अमन मणियार (२५) आणि अजय यादवच्या २३ धावांमुळे ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने दिड शतकी धावसंख्येचा पल्ला पार केला. शाश्वत पाठकने चार फलंदाज बाद केला. शशांक जाधवने दोन, बादल शेख आणि विशाल पाष्टेने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

- Advertisement -

उत्तरादाखल गोलंदाजीप्रमाणे फ्लदाजीतही छाप पाडताना शाश्वत पाठकने दमदार फलंदाजी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण इतर फलंदाजांना अधिका धावा करता आल्या नाहीत. फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरल्याने जे व्ही स्पोर्ट्स क्लबला सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. सिद्धेश जाधवने १५ आणि मिथिलेश यादवने १४ धावा केल्या. आलम शेखने दोन, विरेंद्र यादव, अख्तर शेख आणि अमन मणियारने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

दोन्ही पक्षांची संक्षिप्त धाव फलक

- Advertisement -

ऍग्रीबीड क्रिकेट क्लब : २० षटकात ९ बाद १६९ ( प्रतिक घरत ३९, अख्तर शेख ३०,अमन मणियार २५, अजय यादव २३, शाश्वत पाठक ३-३०-४, शशांक जाधव ४-२२-२, बादल शेख ४-३६-१, विशाल पाष्टे २-१०-१)

जे व्ही स्पोर्ट्स क्लब : २० षटकात ७ बाद १४३ (शाश्वत पाठक ६५, सिद्धेश जाधव १५, मिथिलेश यादव १४, आलम शेख ४-३३-२, अख्तर शेख ४-१-१८-१, विरेंद्र यादव ४-१९-१, अमन मणियार ४-३२-१).

  • ऍग्रीबीड क्रिकेट क्लब २६ धावांनी विजयी.
  • सामनावीर – अख्तर शेख.

हेही वाचा – विराट कोहली आणि रोहित शर्माला वनडे रँकिगमध्ये मोठा फायदा, पहिल्या क्रमांकावर कोण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -