घरक्रीडामुंबई क्रिकेट असोसिएशनने मागवले अर्ज

मुंबई क्रिकेट असोसिएशनने मागवले अर्ज

Subscribe

प्रशिक्षकांना मिळणार बोनस!

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) वेगवेगळ्या वयोगटांच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये सिनियर संघाच्या प्रशिक्षकपदाचाही समावेश आहे. सिनियर संघाला जर रणजी करंडक जिंकण्यात यश आले, तर प्रशिक्षकांना १२ लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे. एमसीएच्या संकेतस्थळानुसार सिनियर संघाच्या प्रशिक्षकाला एका वर्षाला २४ लाखांचे मानधन मिळणार असून त्याच्या मार्गदर्शनाखाली संघ रणजी करंडक जिंकल्यास किंवा अंतिम फेरी गाठल्यास त्याला बोनसही मिळणार आहे.

मुंबईला मागील काही काळापासून रणजी करंडकात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी आपले ४१वे आणि अखेरचे जेतेपद २०१५-१६ मध्ये मिळवले होते. त्यामुळे एमसीएने आता नवे प्रशिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनखाली मुंबईने रणजी करंडक जिंकला, तर प्रशिक्षकाला १२ लाख रुपयांचा बोनस मिळेल. तसेच मुंबई जर अंतिम फेरी गाठली, तर प्रशिक्षकांना ६ लाख रुपयांचा बोनस मिळेल. एमसीएच्या एका सिनियर पदाधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार एमसीएने पहिल्यांदाच प्रशिक्षकांचे मानधन आणि त्यांना मिळणारा बोनस हे जाहीरपणे घोषित केले असून पारदर्शकता टिकवणे हा या मागचा उद्देश आहे.

- Advertisement -

बोनस हा फक्त सिनियर संघाच्या प्रशिक्षकांनाच मिळणार नसून २३ वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकांना सी. के. नायडू करंडक जिंकल्यास ७.५ लाख तर अंतिम फेरी गाठल्यास ३.५ लाखांचा बोनस मिळणार आहे. तसेच या संघाच्या प्रशिक्षकांना १५ लाखांचे मानधन मिळणार आहे. एमसीएने १६ आणि १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदासाठीही अर्ज मागवले आहेत. त्याचप्रमाणे १४ वर्षांखालील संघ, सिनियर आणि १९ वर्षाखालील महिला संघ यांनाही नवे प्रशिक्षक मिळणार असून इच्छुकांनी १३ मेच्या आधी अर्ज भरायचा आहे. मुंबई सिनियर संघाचे सध्याचे प्रशिक्षक विनायक सामंत प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज भरण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -