घरक्रीडाअमर हिंद मंडळ उपांत्य फेरीत

अमर हिंद मंडळ उपांत्य फेरीत

Subscribe

मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो

अमर हिंद मंडळाने लायन्स क्लब ऑफ माहीम आणि मुंबई खो-खो संघटना यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सब-ज्युनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसेच युवक क्रीडा मंडळ, विद्यार्थी क्रीडा केंद्र आणि ओम समर्थ या संघांनाही या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश आले.

सब-ज्युनियर गटातील मुलांमध्येअमर हिंद मंडळाने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा ७-६ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अमर हिंदच्या विजयात विघ्नेश कोरे (६:००, ६:०० मिनिटे संरक्षण), रोहन जाधव (नाबाद १:०० मिनिटे संरक्षण आणि १ बळी), पार्थ चव्हाण (३ बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दुसर्‍या सामन्यात युवक क्रीडा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबवर १४-१० अशी मात केली. अमित पाल (२:००, २;३० मिनिटे संरक्षण आणि३ बळी), ओंकार घवाळी (नाबाद २:४० मिनिटे संरक्षण आणि २ बळी)हे खेळाडू युवककडून चांगले खेळले.

- Advertisement -

विद्यार्थीची ओम साईश्वरवर मात

विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम साईश्वर सेवा मंडळाचा ९-३ असा पराभव केला. मात्र, या पराभवानंतरही साईश्वरने स्पर्धेत आगेकूच केली. विद्यार्थीकडून अथर्व पालव (३:२० मिनिटे संरक्षण), अथर्व फाटक (१:२० मिनिटे संरक्षण आणि २ बळी)यांनी अप्रतिम खेळ केला. ओम साईश्वरच्या राजेश मंडल (१:५० मिनिटे संरक्षण आणि १ बळी) आणि नितेश अष्टमकर (१:१० मिनिटे संरक्षण) यांनी चांगली झुंज दिली. मात्र, त्यांना इतरांची साथ लाभली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -